Union Budget 2023 : अर्थसंकल्पाचे सर्व लेटेस्ट अपडेट आता एकाच ठिकाणी; Dailyhunt वाचून अपडेटेड रहा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशाच्या अर्थमंत्री (Union Budget 2023) निर्मला सीतारामन 1 फेब्रुवारीला केंद्रीय अर्थसंकल्प सादर करणार आहेत. आगामी 2024 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी मोदी सरकारचा हा शेवटचा अर्थसंकल्प असल्यामुळे या अर्थसंकल्पाला मोठं महत्त्व आहे. निवडणुकीपूर्वी देशातील जनतेला खुश करण्यासाठी सरकारकडून नेमक्या कोणकोणत्या घोषणा करण्यात येणार याकडे देशवासीयांचे लक्ष्य असेल.

संसदेचे अर्थसंकल्पीय (Union Budget 2023) अधिवेशन आजपासून सुरू होत असून 6 एप्रिल रोजी संपणार आहे. यामधील 14 फेब्रुवारी ते 12 मार्चपर्यंत सुट्टी राहील. कोरोना महामारीनंतर आर्थिक दृष्ट्या पुन्हा एकदा देशाला प्रगतीपथावर आणण्यासाठी महत्वपूर्ण अंतर्दृष्टि प्रदान करण्याची अपेक्षा 2023 च्या अर्थसंकल्पात अपेक्षित आहेत. यंदाच्या अर्थसंकल्पातून देशातील शेतकरी वर्गाला, छोट्या व्यापाऱ्यांना आणि नोकरदार वर्गाला सरकारकडून मोठ्या अपेक्षा आहेत. देशातील महागाई आणि बेरोजगारीचे प्रमाण वाढलं असून त्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी केंद्र सरकार कोणती ठोस पाऊले उचलतेय हे सुद्धा या अर्थसंकल्पाच्या माध्यमातून पाहावं लागेल.

जलद Updates साठी Dailyhunt पहा – (Union Budget 2023)

Dailyhunt वर्षानुवर्षे (Union Budget 2023) अर्थसंकल्पाचे थेट कव्हरेज देत आलं आहे. यंदाही देशासाठी महत्त्वपूर्ण असलेल्या या केंद्रीय अर्थसंकल्पाचे सर्व अपडेट्स तुम्ही डेलिहंट वर पाहू शकता. अर्थसंकल्पाच्या संपूर्ण बातम्या, रिअल-टाइम अपडेट्स, अर्थसंकल्पाकडे पाहण्याचा दृष्टिकोन आणि त्याचे विश्लेषण याबाबत संपूर्ण माहिती डेलीहंट वर तुम्ही पाहू शकता. त्यामुळे अर्थसंकल्पाच्या सर्व Live Updates साठी Dailyhunt सोबत रहा!