हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । केंद्रीय अर्थमंत्री (Union Budget 2023) निर्मला सीतारामन 1 फेब्रुवारी रोजी देशाचा सामान्य अर्थसंकल्प 2023-24 (केंद्रीय अर्थसंकल्प 2023) संसदेत सादर करतील. मोदी सरकारच्या दुसऱ्या टर्म मधील हा चौथा अर्थसंकल्प असेल. यावेळी देशातील प्रत्येक घटकाला सरकारकडून मोठी अपेक्षा राहणार आहे. 2024 लोकसभा निवडणुकीपूर्वीचा हा शेवटचा अर्थसंकल्प असल्यामुळे यावेळी सरकारकडून मोठमोठ्या घोषणाही केल्या जाण्याची शक्यता आहे. परंतु तुम्हाला माहित आहे का? अर्थसंकल्प तयार करणारे अधिकारी नजरकैदेत असतात. यामागचे नेमकं कारण काय? हे आज आपण जाणून घेऊया….
खरं तर बजेट बनवण्याच्या (Union Budget 2023) प्रक्रियेत प्रत्येक मंत्रालयाशी चर्चा केली जाते. पण अर्थसंकल्प तयार करताना वित्त सचिव, महसूल सचिव यांची भूमिका विशेष महत्त्वाची असते. हे सर्व अर्थमंत्र्यांना खर्च आणि कमाईचे अंदाजे तपशील देतात. देशातील विविध क्षेत्रातील तज्ञ देखील बजेट टीममध्ये काम करतात. एवढेच नव्हे तर अर्थमंत्र्यांच्या बजेट टीमला मुख्य आर्थिक सल्लागाराचीही गरज आहे. या टीमला पंतप्रधानांचे वेळोवेळी मार्गदर्शन मिळत असते.
गुप्तता पाळण्यासाठी अधिकारी नजरकैदेत असतात- (Union Budget 2023)
बजेट बद्दलची गुप्तता पाळण्यासाठी बजेट तयार करणाऱ्या अधिकाऱ्यांना 10 दिवस नजरकैदेत ठेवलं जात. अर्थसंकल्पाच्या दिवसापूर्वी बजेटशी संबंधित कोणतीही माहिती लीक होऊ नये यासाठी अधिकारी 10 दिवस नॉर्थ ब्लॉकच्या तळघरात राहतात. त्यांना 10 दिवस बाहेरील जगाशी कोणताही संपर्क साधता येत नाही. याशिवाय अर्थ मंत्रालयात बाहेरच्या व्यक्तीला प्रवेशही दिला जात नाही. (Union Budget 2023) फक्त बजेट दस्तऐवज तयार करणाऱ्या टीमलाच नव्हे तर त्याच्या छपाईशी संबंधित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनाही सहकाऱ्यांना भेटण्याची मनाई असते.