Union Budget 2024 । देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन 1 फेब्रुवारी 2024 रोजी 2024- 2025 या आर्थिक वर्षाचे अंतरिम बजेट सादर करणार आहेत. सकाळी 11 वाजता संसदेत हा अर्थसंकल्प सादर केला जाईल. देशात लवकरच लोकसभा निवडणुकीचे बिगुल वाजणार असून नवीन सरकार देशाचा कारभार हातात घेईपर्यंत हे बजेट म्हणजे सरकारसाठी ब्लू प्रिंट मानली जाईल. तसेच लोकसभा निवडणुकीपूर्वी देशभरातील जनतेला खुश करण्यासाठी सरकारची अंतिम आर्थिक रणनीती म्हणूनही हा अर्थसंकल्प महत्त्वाचा आहे.
अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा कालावधी काय? Union Budget 2024-
अर्थसंकल्प 2024 हा देशाला आर्थिक पुनर्प्राप्तीमध्ये गुंतागुंतीच्या वाटेवर मार्गदर्शक म्हणून काम करेल अशी अपेक्षा आहे. देशाचे उत्पन्न आणि एकूण खर्च याचा योग्य समतोल साधण्यावर सरकार भर देत असून स्थिरता आणि विकासासाठी प्रयत्नशील देशामध्ये अल्पकालीन आर्थिक नियोजनासाठी हा अर्थसंकल्प सादर केला जाईल. संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन हे 31 जानेवारीपासून सुरू झाले असून ते 9 फेब्रुवारी 2024 पर्यंत चालणार आहे. या काळात आर्थिक सर्वेक्षण, देशाच्या मागील वर्षातील आर्थिक कामगिरीचे सखोल विश्लेषण आणि वर्षातील सर्वात महत्त्वपूर्ण आर्थिक घोषणा असलेल्या केंद्रीय अर्थसंकल्पासह (Union Budget 2024) महत्त्वाच्या अहवालांचे सादरीकरण होईल.
विशेष म्हणजे या अर्थसंकल्पात सरकार जनतेसाठी कोणत्या नवीन घोषणा करणार आहे? तसेच कर्मचाऱ्यांना आणि नोकरदारांना या अर्थसंकल्पातून कोणता लाभ होईल? शेतकरी आणि महिला वर्गासाठी सरकार कोणतं विशेष धोरण आखणार आहे? आणि त्याकरिता निधीची आर्थिक तरतुद किती असेल? याकेड संपूर्ण देशवासीयांचे लक्ष लागले आहे.
प्रसिद्ध मीडिया प्लॅटफॉर्म डेलीहंट दरवर्षीप्रमाणे यंदाही केंद्रीय अर्थसंकल्पाचे थेट प्रक्षेपण आणि सखोल माहिती आपल्या वाचकांपर्यंत पोहचवत आहे. त्यामुळे यंदाचा केंद्रीय अर्थसंकल्प सोप्या भाषेत जाणून घेण्यासाठी डेलीहंट पाहत राहा आणि देशाच्या आर्थिक गणिताचे नियोजन समजून घ्या.