नवी दिल्ली । काल देशाला उद्देशून केलेल्या भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर तब्बल २० लाख कोटी रुपयांच्या पॅकेजची घोषणा केली. आत्मनिर्भर भारत अभियानाचा नारा देत या पॅकेजमुळे देश झेप घेईल, असा आशावादही मोदींनी व्यक्त केला. मोदींच्या घोषणेनंतर केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी याविषयीचं एक ट्विट केलं. या ट्विटमध्ये त्यांच्याकडून पॅकेजसंदर्भात माहिती देताना चूक झाली. आपली चूक झाल्याचं लक्षात येताच त्यांनी त्यात दुरुस्ती केली. त्याचबरोबर झालेल्या चुकीबद्दल माफी मागायलाही त्या विसरल्या नाही.
याबाबतचं सविस्तर वृत्त असं, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २० लाख कोटी रुपयांच्या पॅकेजची घोषणा केली. या घोषणेनंतर केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी ट्विट करून याची माहिती दिली. मात्र, ट्विट करताना २० लाख कोटी रुपयांऐवजी त्यांच्याकडून २० लाख असं लिहिलं गेलं. ही चूक लक्षात आल्यानंतर त्यांनी लगेच दुरुस्त केली. “टाईप करताना चूक झाली असून, २० लाख ऐवजी २० लाख कोटी असं वाचावं,” असं म्हणत त्यांनी नम्रपणे झालेल्या प्रकाराबद्दल दिलगिरी व्यक्त केली.
Sorry everybody for the typo: please read as Rs 20 lakh crore. https://t.co/w3x6p59ifl
— Nirmala Sitharaman (@nsitharaman) May 12, 2020
दरम्यान, देशात कोरोनाच्या संकटानं अडचणींमध्ये मोठी भर घातली आहे. एकीकडं आरोग्य क्षेत्रातील समस्यांना तोंड देत असताना आर्थिक संकटही लॉकडाउनमुळं गंभीर होताना दिसत आहे. लॉकडाउनमुळे सर्व व्यवहार ठप्प झाल्यानं बेरोजगारीबरोबर इतर आर्थिक आव्हान उभी राहिली आहेत. अशा परिस्थितीत केंद्र सरकारनं मोठ्या पॅकेजची घोषणा करावी, अशी मागणी राजकीय नेत्यांसह विविध क्षेत्रातील व्यक्तींकडून केली जात होती. अखेर केंद्र सरकारनं अर्थजगतासह देशातील विविध घटकांना दिलासा दिला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी देशवासीयांशी संवाद साधताना २० लाख कोटी रुपयांच्या पॅकेजची घोषणा केली.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”