अमित शाह पुन्हा संतापले; स्टेजवर स्वागत कार्यक्रमात कार्यकर्त्यावर दाखवली दादागिरी

Amit Shah BJP program video viral
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भाजपचे नेते तथा केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याकडून अनेकवेळा आपल्या पक्षातील नेत्यांवर राग व्यक्त केला जातो. काहीवेळा त्यांच्याकडून कार्यकर्त्यांना भर कार्यक्रमातच तंबी दिली जाते तर कधी दादागिरी दाखवली जाते. याचा प्रत्यय एका कार्यक्रमात आला असून सत्कारावरून अमितभाई चांगलेच भडकल्याचे पहायला मिळाले. त्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झालेला आहे.

देशाचे गृहमंत्री अमित शाह यांनी नुकतीच एका कार्यक्रमास हजेरी लावली. यावेळी त्यांचा कार्यकर्त्यांच्यावतीने जाहीर सत्कार करण्यात आला. मात्र, सत्कार करताना त्यांच्या फोटोसेशनवेळी सत्कार करणारे वारंवार फोटोच्या आड येत होत होते. आपला फोटो काढण्याच्या भानामध्ये नेत्यांना बाजूला उभे असलेले अमितशहा फोटोत येत नसल्याचेही समजत नव्हते. हा सर्व प्रकार अमित शहा यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी संताप व्यक्त करत नेत्यांसह एका कार्यकर्त्याला स्टेजवरून ढकलण्याचा प्रयत्न केला आहे.

अमित शाह यांचे स्वागत करण्यासाठी नेत्यांनी भलामोठा हार आणला होता. हातघालत असताना काही कार्यकर्ते पुढे येऊ लागल्याने अमित शाह यांनी त्यांना हाताने बाजूला ढकलले. एकंदरीत शहा भडकल्याने कार्यकर्तांनी जागेवरच उभे राहत फोटो काढणे पसंद केले. त्यांचा हा व्हिडीओ दीपक खत्री या ट्वीटर अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे.