सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके
सातारा येथील जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण मल्टीपर्पज हॉलमध्ये केंद्र सरकार आणि जिल्हा अग्रणी बँक यांच्या वतीने जिल्ह्यातील बुडीत बॅंकाच्या ठेवीदारांचा आज मेळावा आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमाला केंद्रीय राज्यमंत्री देवुसिंह चौहान यांनी उपस्थिती लावली होती. यावेळी त्यांनी ठेवीदारांना मार्गदर्शन केले.
यावेळी प्रामुख्याने या कार्यक्रमाला केंद्रीय संचार राज्यमंत्री देवुसिंह चौहान, माढा लोकसभा मतदार संघाचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, जावळी – सातारा आमदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले, खटाव- माण तालुक्याचे आमदार जयकुमार गोरे, बँक ऑफ महाराष्ट्र जनरल मॅनेजर विजय श्रीवास्तव, झोनल मॅनेजर बँक ऑफ महाराष्ट्र सातारच्या अपर्णा जोगळेकर यांच्यासह विविध जिल्ह्यातील बँक अधिकारी, खातेदार व इतर नागरिक उपस्थित होते.
यावेळी मंत्री शिवराज चौहान यांच्या हस्ते बॅंका बुडीत गेल्यामुळे जी रक्कम खातेदारांना मिळणे शक्य नव्हते त्या सर्व खातेदारांना DICGC कायद्या अंतर्गत विमा संरक्षण दिले जाते. अशा काही ठेवीदारांना या वेली ठेवीदारांना रक्कम चेकचे वाटप या खातेदारांना करण्यात आले. दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ऑनलाइन संवादाद्वारे देशातील 18 ठिकाणी होऊ घातलेल्या या कार्यक्रमातील खातेदारांशी थेट संवाद साधला. या ऑनलाईन संवादाचेही थेट प्रक्षेपण या कार्यक्रमात करण्यात आले होते.