ओबीसी आरक्षणाबाबत प्रकाश आंबेडकरांचं महत्वाचं विधान; म्हणाले कि…

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या ओबीसींच्या आरक्षणावरून महाविकास आघाडी सरकारवर भाजप नेत्यांकडून टीका केली जात आहे. अशात आता वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी ओबीसी राजकीय आरक्षणाच्या बाबतीत महत्वाचे विधान केले आहे. “ओबीसींना आपली आर्थिक उन्नती साधायची असेल आणि सामाजिक प्रतिष्ठा मिळवायची असेल तर त्यांना मुस्लिम धर्म स्वीकारण्या शिवाय पर्याय नाही. ओबीसी मुस्लिम धर्म स्वीकारणार का?, असा सवाल यावेळी आंबेडकरांनी केला.

वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, ओबीसींना आरक्षण मिळवायचे असेल तर त्यांनी क मुस्लिम धर्म स्वीकारला` पाहिजे. जोपर्यंत ते धर्म स्वीकारत नाहीत. तोपर्यंत त्यांची आर्थिक उन्नती होणार नाही. ओबीसींनी आपल्या आर्थिक उन्नतीकडे आणि सामाजिक प्रतिष्ठेकडे लक्ष दिले पाहिजे. ते द्यायचे असेल तर त्यांना या धर्मांध पक्षाच्या बाहेर पडावे लागेल.

ज्या पक्षांना ओबीसी समाजबांधव आपले मानत आहेत, त्या पक्षांना सोडून स्वत:चा राजकीय पक्ष निर्माण करावा लागेल. ओबीसी हे मुस्लिम धर्म स्वीकारणार नाहीत हे शंभर टक्के सर्वांना माहीत आहे, असेही आंबेडकर यांनी सांगितले. यावेळी आंबेडकरांनी छगन भुजबळ यांच्यावर निशाणा साधला. ओबीसींच्या आरक्षणाबाबत बोलू नये. 1990 साली ते कोणत्या पक्षात होते. ते पूर्वी धर्मांध राजकारणात होते. मंडल कमिशनला विरोध करणाऱ्यांच्या पक्षात होते, असं सांगतानाच भुजबळांनी ओबीसींसाठी काय केले ते सांगावे? असा सवाल उपस्थित करीत त्यांना आव्हानही दिले.

Leave a Comment