हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाड येथील तळीये गावात पावसामुळे दरड कोसळून मोठ्या प्रमाणात जीवितहानी झाली होती. तब्बल 40 पेक्षा अनेक लोकांना आपला जीव गमवावा लागला होता. याच पार्श्वभूमीवर आज भाजपचे केंद्रीयमंत्री नारायण राणे, विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, देवेंद्र फडणवीस हे तळिये गावाची पाहणी केली. यावेळी मंत्री राणेंनी मुख्यमंत्री ठाकरेंवर गंभीर टीका केली. ” उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यापासून राज्यावर सतत संकटाचे आभाळ कोसळत आहे. राज्यावरील हे नवे संकट हा मुख्यमंत्र्यांचा पायगुण आहे,” असे राणे यांनी म्हंटले.
यावेळी अधिकाऱ्यांकडून दुर्लक्ष केल्यामुळे राणे यांनी अधिकाऱ्यांवर आगपाखड केली. यावेळी मंत्री राणे म्हणाले कि, ” या ठिकाणी मृत्यू पावलेल्यांच्या कुटुंबियांना पूर्णपणे मदतकार्य केले जाईल. राज्यात संकट येत आहेत. त्याला कारण मुख्यमंत्र्यांचा पायगुण आहे. ते आल्यापासून वादळं काय, पाऊस काय, कोरोना काय सगळेच सुरु आहे. कोरोना ही त्यांची देण आहे. मुख्यमंत्री कोरोना घेऊनच आले आहेत. त्यांचे आता पाय पाहायला पाहिजे.
चिपळूणला मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तर तळिये गावात अनेकजण मृत्यू मुखी पडले आहेत. उद्धवस्थ झालेल्या कुटुंबातील लोक आपल्या घरातील सामान फेकून देत आहेत. आणि अधिकारी दात काढत आहेत. मुख्यमंत्र्यांना सोडवायला गेले. ते काय पाहुणे आहेत काय? येऊन पाहणं हे त्यांचं काम आहे. अधिकारीच बेजबाबदारच आहेत, असावीअ आरोप यावेळी राणेंनी केला.