नारायण राणेंना असलेल्या रोगावर शिवसेनेकडं जालिम उपाय; तुम्ही आता पहाच दोन दिवसांत काय काय होतं

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भाजपच्या जन आशीर्वाद यात्रेत केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केले होते. याबाबत औरंगाबाद येथील शिवसेना आमदार अंबादास दानवे यांनी औरंगाबाद पोलीस ठाण्यात मंत्री राणेंविरोधात गुन्हा दाखल केला. राणेंना शिवसेना प्रमुख हे नारू म्हणत होते. आणि नारू रोगाचा उपाय आणि नारू एक प्रकारचा आजार आहे तो एक रोग आहे. आणि या रोगावरचा जालीम उपाय शिवसेनेकडे नक्कीच आहे. त्याचा ते कायदेशीर व राजकीय उपाय नक्की करतील, असे आमदार दानवेंनी म्हंटले आहे.

यावेळी शिवसेना आमदार दानवेंनी माध्यमांशी संवाद साधत राणेंवर टीकाही केली आहे. यावेळी आमदार दानवे म्हणाले की, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंबद्दल काळ मंत्री नारायण राणेंनी जे काही आक्षेपार्ह वक्तव्य केले त्याचा आम्ही निषेध करत आहोत. तसेच राणेंचे मुख्यमंत्र्यांबाबत वक्तव्य हे आक्षेपार्ह आहे. हा एक प्रकारचा शिवसेनेला डिवचण्याचा प्रकार केला गेलेला आहे.

https://www.facebook.com/hellomaharashtra.in/videos/4554421551256380/

भाजप नेते तथा केंद्रीय मंत्री नारायण राणेंनी केलेल्या वक्तव्याचे पडसाद राज्यभर उमटत आहेत. औरंगाबाद येथेही याचे पडसाद उमटले असून या ठिकाणी शिवसेना आमदार अंबादास दानवे यांनी औरंगाबाद येथील पोलीस ठाण्यात जाऊन मंत्रींनारायण राणेंच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

Leave a Comment