हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अनेकवेळा एखादा नेता मंत्री झाला कि त्याचच मंत्रिपदाचे सिकेरेट सांगत नाही. मात्र, आज केंद्रीयमंत्री नारायण राणे यांनी आपल्या केंद्रीयमंत्री होण्यामागचे नेमके सिक्रेट काय? कोनाच्या मदतीने आपण कॅबिनेटमंत्री झालो यामागचे सिक्रेट सांगितले. पुणे येथील आयोजित कार्यक्रमात केंद्रीय कॅबिनेट मंत्री नारायण राणे यांनी “माझा उल्लेख मी केंद्रात कॅबिनेट मंत्री आहे करतो, पण व्हाया देवेंद्र फडणवीस असा आहे. दिल्लीत जा असा आदेश त्यांनीच दिला, असे मंत्रिपदाचे सिक्रेट सांगताच फडणवीसांनी हात जोडले.
भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त आज पुण्यात कार्यक्रमास केंद्रीय मंत्री नारायण राणे व भाजप नेते तथा देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थिती लावली. यावेळी आयोजित कार्यक्रमात मंत्री नारायण राणे यांनी मनोगतही व्यक्त केले. यावेळी राणे यांनी आपल्या मनोगतात आपण केंद्रीयमंत्री कसा झालो. आपल्याला कुणी केंद्रात पाठवले याचे सिक्रेट सांगितले.
यावेळी राणे म्हणाले, आजचा दिवस हा महत्वाचा आहे, हा कार्यक्रम भावनिक आहे, कर्तव्याची जाणीव करुन देणारा आहे. आज देशाला बाबासाहेबांसारख्या नागरिकांची गरज आहे. माझा केंद्रात कॅबिनेट मंत्री असा उल्लेख होतो. पण मी व्हाया देवेंद्र फडणवीस आहे. मला फडणवीसांनीच केंद्रात पाठवले आहे, अशी मिश्किल टिप्पणी राणेंनी करताच फडणवीसांनी हात जोडले.
मराठा आरक्षणावरून महाविकास आघाडी सरकारने नेहमीच दिशाभूल केली – राणे
पुणे येथील कार्यक्रमात केंद्रीयमंत्री नारायण राणे यांनी महाविकास आघाडी सरकावर निशाणा साधला. यावेळी राणे म्हणाले की, मराठा आरक्षणाबद्दल महाराष्ट्र्रात खूप आंदोलने झाली. विरोधकांनी बरेच भाजप व तेव्हाच्या फडणवीसांच्या सरकावर टीका केली. काय म्हणे यांनी काय आरक्षण दिले. हे घटनेत बसत नाही. केंद्र सरकारने व राष्ट्रपतींनी याबाबात निर्णय घ्यावा, असे फार फार बोलले. मी काही तज्ञांना बोलवून विचारले कि हे घटनेत बसतो कि नाही. तेव्हा त्यांनी सांगितले कि राज्य सरकारला आरक्षण देण्याचा अधिकार आहे. तेव्हा फडणवीसांनी ते दिले. मात्र, या महाविकास आघाडी सरकारने मराठा आरक्षणावरून जनतेची दिशाभूल केली आहे, अशी टीका राणे यांनी केली.