हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुंबई येथून सुरु केलेली जन आशिर्वाद यात्रा आता स्थगित करण्यात आलेली आहे. भाजपकडून मोठ्या उत्साहात जन आशिर्वाद यात्रेला सुरुवात करण्यात आलेली होती. या जन आशिर्वाद यात्रेतून केंद्रीय मंत्री नारायण राणेंनी आक्षेपार्ह वक्तव्य केल्यामुळे त्यांना आज पोलिसांनी अटक केली असल्याने त्यांची जन आशीर्वाद यात्रा स्थगित करण्यात आली आहे.
केंद्रित मंत्री नारायण राणे यांच्या अटकेपूर्वी विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी संवाद साधला होता. यावेळी त्यांनी मंत्री नारायण राणे यांच्या अटकेनंतरही जन आशीर्वाद यात्रा कोणत्याही परिस्थितीत पुढे सुरु राहणार असे म्हंटले होते. हि जन आशीर्वाद यात्रा विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, रवींद्र चव्हाण, आशिष शेलार यांच्या नेतृत्वाखाली हि जन आशीर्वाद यात्रा पुढे पूर्ण करू, पोलिसांच्या भरवशावर भाजपला रोखण्याचा प्रयत्न पन्नास वर्षे झाला. पण भाजप मागे हटली नाही, असे फडणवीसांनी म्हंटले होते.
जनआशीर्वाद यात्रा थांबणार नाही!
(पत्रपरिषद । मुंबई । दि. 24 ऑगस्ट 2021)#JanAshirwadYatra pic.twitter.com/7p4gB4e0IO— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) August 24, 2021
मात्र, केंद्रीयमंत्री नारायण राणे यांना पोलिसांकडून अटक करण्यात आली असून त्यांना संगमेश्वर पोलीस स्टेशनमधून त्यांना म्हाडाकडे नेण्यात आले. या ठिकाणी मंत्री राणेंनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केले होते. दरम्यान विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर हेही जन आशीर्वाद यात्रा सोडून रायगडकडे रवाना झाले आहेत. त्यामुळे भाजपची जन आशीर्वाद यात्रा आता स्थगित करण्यात आलेली आहे.