सध्या तरी मुंबईत पाऊल ठेवण्याची माझ्यात हिंमत नाही- नितीन गडकरी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

वृत्तसंस्था । ‘सध्या जी परिस्थिती आहे ती पाहता मुंबईत येण्याची हिंमत माझ्यात नाही. पण ही परिस्थिती नक्की बदलेल असा मला विश्वास आहे,’ असं वक्तव्य केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केलं आहे मुंबईतील कोरोना परिस्थितीबाबत केलं आहे. कोरोनानंतर लघु उद्योग तसंच पायाभूत सुविधा कशा पद्दतीने विकासाचा पाया रचण्यात महत्त्वाची भूमिक निभाऊ शकतात यावर आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.

देशातील सर्वात जास्त करोनाबाधित रुग्ण महाराष्ट्रात असून पहिल्या क्रमांकावर आहे. त्यातही महाराष्ट्रात मुंबई एक मुख्य हॉटस्पॉट आहे. सर्वात जास्त करोनाबाधित रुग्ण मुंबईत आहेत. मुंबईतील एकूण बाधितांची संख्या ५९ हजार २०१ वर गेली आहे. तर मृतांची संख्या २२४८ वर गेली आहे. दिलासादायक बाब म्हणजे मुंबईत सोमवारी एका दिवसात ३१३९ रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी गेले आहेत. त्यामुळे मुंबईतील सक्रीय रुग्णांपेक्षा करोनामुक्त रुग्णांची संख्या अधिक झाली आहे. मुंबईतील करोनामुक्तीचा दर ५० टक्के झाला आहे.

एका दिवसात ३१३९ इतक्या मोठ्या संख्येने रुग्णांना घरी पाठवण्यात आल्यामुळे कोरोनामुक्तीचा दर चांगलाच वाढला आहे. आतापर्यंत ३० हजार १२५ रुग्ण करोनामुक्त झाले आहेत. तर २६,८२८ रुग्ण सक्रीय असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. कोरोनामुक्त रुग्णांचा आकडा सक्रीय रुग्णांपेक्षा वाढला असल्यामुळे मुंबईत आता सक्रीय रुग्णांची संख्या कमी होत जाणार का, याकडे पालिकेच्या आरोग्य यंत्रणेचे लक्ष लागणार आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

 

Leave a Comment