हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यात मोठ्या प्रमाणात कोरोनाचे संकट आले. तसेच पाणी टंचाईमुळे दुष्काळहि निर्माण झाला. त्याचा फटका शेतकऱ्यांसह कारखानदाऱ्यानाही बसला आहे. दुष्काळामुळे ऊसाला पाणी न मिळाल्याने शेतकऱ्याना ऊस घालता आला नाही. याच मुद्द्यावरून केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी एक विधान केले आहे. “दुष्काळ, कोविडमुळे साखर कारखाने अडचणीत आले आहेत,” असे दानवे यांनी म्हंटले आहे.
महाराष्ट्रातील भाजपच्या एका शिष्टमंडळाने आज सहकारमंत्री अमित शहा यांची भेट घेतली. त्या शिष्टमंडळात केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस तसेच इतर सहकार क्षेत्रात कार्य करणारे कार्यकते उपस्थित होते. या भेटीनंतर मंत्री दानवे यांनी माध्यमांशी संवाद साधला.
त्यावेळी मंत्री दानवे म्हणाले की, राज्यात साखर कारखानदारीमध्ये मोठ्या प्रमाणात अनेक प्रकारच्या अडचणी निर्माण झाल्या आहेत. यावर शहा यांच्याशी चर्चा केली. कधी दुष्काळ तर कोविडमुळे साखर कारखाने अडचणीत आले. त्याचा परिणाम कारखान्यांचे अकाऊंट एनपीएमध्ये गेले. यामुळे एनपीए झालेल्या साखर कारखान्यांना सरकारने पुन्हा कर्ज द्यावे, अशी मागणी आम्ही अमित शहा यांच्याकडे केली आहे.