मुंबई महापालिका निवडणुकीनंतर राज्यातील सरकार कोसळणार; रामदास आठवलेंच भाकित

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | राज्यात महाविकास आघाडी स्थापन झाल्यापासून ते कोसळणार असल्याचे भाजप नेत्यांकडून वारंवार सांगितले जात आहे. यापूर्वी भाजप नेते देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील यांनीही सरकार पडणार असल्याचे म्हंटले होते. त्यांच्यानंतर आता केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी आघाडी सरकार कोसल्याबाबत भाकीत केले आहे. “मुंबई महापालिका निवडणुका संपल्या की मार्चच्या आसपास राज्यातील महाविकास आघाडी सरकार कोसळेल, असे आठवले यांनी म्हंटले आहे.

लोणावळा येथे आज आरपीआय पक्षातील कार्यकर्त्यांच्या मेळावा पार पडला. या मेळाव्यानंतर मंत्री आठवले यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, महाविकास आघाडीची सत्ता फार काळ टिकणार नाही. त्यामुळे अडीच-अडीच वर्षे मुख्यमंत्रीपद वाटून घेण्याचा फॉर्म्युला भाजप-शिवसेनेने अवलंबनेच योग्य आहे.

मुंबई महानगरपालिका निवडणुका संपल्या की महाविकास आघाडीमधील चित्र बदलणार आहे. मार्चच्या आसपास महाविकास आघाडी सरकार पदणार असून भाजप सत्तेत येईल, असे आठवले म्हणाले.

आरपीआयचे कार्यकर्ते भिडले

आज केंद्रीयमंत्री रामदास आठवले यांच्या प्रमुख उपस्थितीत लोणावळा येथे पदाधिकारी कार्यकर्त्यांचा कार्यक्रम पार पडला. यावेळी कार्यक्रम सुरू असतानाच आठवले यांच्या समोरच रिपाइं कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची झाली. अध्यक्षपद मिळावे म्हणून कार्यकर्ते आपआपसात भिडले. अचानक सुरू झालेल्या या राड्यामुळे वातावरण चांगलंच तापले होते.

Leave a Comment