सांगली प्रतिनिधी| सामाजिक कार्यकर्ते शिवराम ठवरे आणि सुनंदा पाटील यांची मुलगी स्वरा हिच्या चौथ्या वाढदिवसानिमित्त एस.टी. वाचवा, एस.टी. वाढवा जनजागृती सभेचं आयोजन करुन साजरा केला आगळा वेगळा वाढदिवस. “गरिबांच्या हक्काची एसटी वाचवा एसटी वाढवा” या पुस्तकाच्या २०० प्रती सुनंदा पाटील आणि शिवराम ठवरे यांचेकडून त्यांची मुलगी स्वराच्या वाढदिवसाच्या निमित्तानं एसटी कर्मचारी आणि प्रवासी यांना मोफत भेट देण्यात आल्या.
सामान्य जनतेला सोबत घेऊन महाराष्ट्राची जीवनदायी एस. टी. वाचवणार असल्याचे प्रतिपादन विद्रोही सांस्कृतिक चळवळ आणि एस.टी.कामगार संघटेनेचे नेते अॅड. के.डी शिंदे यांनी केले आहे. एसटी वाचवा एसटी वाढवा परिषदेच्या वतीने तासगाव एस.टी. आगारात आयोजित केलेल्या सभेत ते बोलत होते.
अॅड. के.डी शिंदे यावेळी म्हणाले, धोरणात्मक निर्णय न घेतल्यामुळे एसटी तोट्यात चालली आहे. लांब पल्याच्या गाड्या खाजगी लोकांच्या माध्यमातून चालवल्या जात आहेत. ‘शिवशाही’ नावाचा बिनकामाचा हत्ती एस.टीकडे पोसायला दिलेला आहे. एसटी कामगारांच्या अनंत अडचणी आहेत पण त्या सोडवण्यासाठी आम्ही स्वस्थ बसणार नाही. सामान्य जनतेच्या आणि निवृत्त एसटी कामगारांच्या माध्यमातून मोठी चळवळ उभी करून एसटीला गतवैभव मिळवून देण्याचा संकल्प त्यांनी यावेळी केला.
विद्रोही सांस्कृतिक चळवळीचे उपाध्यक्ष डॉ.बाबुराव गुरव म्हणाले, महाराष्ट्राच्या इतिहासातील सुवर्णकाळ अनुभलेली एसटी खाजगीकरणासाठी राज्यकर्ते अडचणीत आणत आहेत. सर्वसामान्य माणसांचे शिक्षण रोजगार आणि विकास बंद व्हावेत, या हेतूने सरकारी उपक्रम काही मोजक्या लोकांच्या नफेखोरीसाठी अडचणीत आणले जात आहेत. गरिबांच्या हक्काची एसटी टिकवण्यासाठी “एसटी वाचवा एसटी वाढवा परिषदे”च्या माध्यमातून सुरु असलेल्या कार्यक्रमांची माहिती त्यांनी यावेळी सांगितली.
जनजागृती सभेचे सूत्रसंचालन सुभाष कुलकर्णी यांनी केले तर शिवराम ठवरे यांनी कार्यक्रमाच्या संयोजनाची माहिती सांगून प्रस्तावित केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राजू कांबळे होते तर आभार जयवंत माने यांनी मानले. कार्यक्रमास एसटी कर्मचारी, अधिकारी, प्रवासी विद्यार्थी आणि सुनंदा पाटील, लक्ष्मण डोंबे, हणमंत गायकवाड, जी. बी. कांबळे आदी प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते.
दिवसभराच्या ताज्या घडामोडी आणि हटके लेख घरबसल्या मोफत मिळवण्यासाठी आजच आमचा WhatsApp ग्रुप जाॅइन करा. Facebook Page लाईक करा.
WhatsApp Group – 9890324729
Facebook Page – Hello Maharashtra
इतर महत्वाचे –
अरविंद केजरीवाल यांनी घेतला मोठा निर्णय! शेतकऱ्यांसाठी स्वामिनाथन आयोग लागू
अण्णांच्या ३८ व्या पत्राला पंतप्रधान कार्यालयाकडून अवघ्या एका ओळीत उत्तर !
सर्वोच्च न्यायालयाचा ‘निमलष्करी दलांना’ मोठा दिलासा, मिळणार हे लाभ