Bank FD : खुशखबर !!! आता ‘या’ स्मॉल फायनान्स बँकेच्या FD वर ग्राहकांना मिळणार 9.50% व्याज

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Bank FD: महागाईवर नियंत्रण ठेवण्यासाठी गेल्या 9 महिन्यांत RBI ने रेपो दरात वारंवार वाढ केली आहे. ज्यानंतर अनेक सरकारी आणि खाजगी बँकांकडून एफडीवरील व्याजदरात वाढ केली गेली ​​आहे. याच दरम्यान युनिटी स्मॉल फायनान्स बँक लिमिटेडने आपल्या 2 कोटींपेक्षा कमीच्या फिक्स्ड डिपॉझिट्सवरील व्याजदरात वाढ केली आहे.

DAVINDER SAINI - Banking - Unity Small Finance Bank | LinkedIn

15 फेब्रुवारी 2023 पासून नवीन दर लागू

बँकेच्या अधिकृत वेबसाइटनुसार, 15 फेब्रुवारी 2023 पासून हे नवीन दर लागू होणार आहेत. युनिटी स्मॉल फायनान्स बँकेकडून आता ज्येष्ठ नागरिकांना 1001 दिवसांसाठी बुक केलेल्या FD वर 9.50% तर सर्व सामान्य गुंतवणूकदारांना 9.00% असा आकर्षक दर दिला जातो आहे. याशिवाय, युनिटी बँक 181-201 दिवस आणि 501 दिवसांच्या कालावधीसाठी ज्येष्ठ नागरिकांना 9.25% आणि सर्व सामान्य गुंतवणूकदारांना 8.75% व्याज दर मिळत आहे. Bank FD

Senior Citizen Savings Scheme vs bank FDs for senior citizens: Updated  interest rates, tax benefits - BusinessToday

युनिटी स्मॉल फायनान्स बँकेच्या एफडीचे नवीन व्याज दर

या बँकेकडून आता 7-14 दिवसांच्या FD वर 4.50%,15-45 दिवसांच्या FD वर 4.75%, 46 ते 60 दिवसांच्या FD वर 5.25% तर 61 ते 90 दिवसांच्या FD वर 5.50% व्याजदर दिला जात आहे. तसेच आता बँक 91 ते 180 दिवसांच्या FD वर 5.75%,181 ते 201 दिवसांच्या FD वर 8.75%, 202-364 दिवसांच्या FD वर 6.75%, 365-500 दिवसांच्या FD वर 7.35% व्याजदर देईल. Bank FD

Fear of lending, few borrowers — why banks are flooding RBI with funds for low returns

रेपो दरात सलग सहाव्यांदा वाढ

8 फेब्रुवारी रोजी RBI ने सलग सहाव्यांदा रेपो दरात वाढ केली. RBI चे गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी पतधोरण बैठकीनंतर बोलताना सांगितले की,” जगातील वाढत्या महागाईचा दबाव भारतावरही आहे आणि त्यावर पूर्णपणे मात करण्यासाठी पुन्हा एकदा कर्जाच्या व्याजदरात वाढ करणे आवश्यक झाले आहे. मात्र, यावेळी रेपो दरात केवळ 0.25 टक्के वाढ करण्यात आली आहे.” Bank FD

अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://theunitybank.com/

हे पण वाचा :
Tax Saving Tips : आपल्या गुंतवणुकीचे अशा प्रकारे नियोजन करून वाचवा टॅक्स
Adani Group ला आणखी एक झटका !!! सिटी बँकेनंतर आता ‘या’ बँकेने देखील कर्ज देण्यास नकार
Pre-Approved Loan म्हणजे काय ??? जाणून घ्या ते घेण्याचे फायदे
उन्हाळ्यातील रखरखत्या उन्हात ‘हा’ छोटासा fridge भागवेल आपली तहान !!!
Ration Card धारकांसाठी आनंदाची बातमी !!! देशभरात नवीन नियम लागू