मनसे नेते संदीप देशपांडे यांच्यावर प्राणघातक हल्ला; रुग्णालयात दाखल

0
165
Sandeep Deshpande
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मनसेचे नेते संदीप देशपांडे यांच्यावर हल्ला झाला आहे. आज सकाळी मॉर्निंग वॉकला गेल्यावर त्यांच्या शिवाजी पार्क येथे हल्ला झाला. हल्ला करून हल्लेखोर पसार झाले. या हल्ल्यात देशपांडे जखमी झाले आहेत. त्यांना हिंदुजा रुग्णालयात दाखल करण्यात आले. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे.

संदीप देशपांडे हे आज नेहमीप्रमाणे मॉर्निंग वॉकला शिवाजी पार्कात आले होते. यावेळी मॉर्निंग वॉक करत असतानाच अचानक काही लोकांनी त्यांच्यावर हल्ला केला. त्यांना रॉड आणि स्टम्पने बेदम मारहाण केली. अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे देशपांडे प्रतिकार करू शकले नाही. ते जखमी होऊन खाली कोसळले.

देशपांडे यांच्यावर हल्ला झाल्यानंतर शिवाजी पार्कात मॉर्निंग वॉकला आलेल्या लोकांनी त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला. नागरिकांना येताना पाहताच हल्लेखोर त्या ठिकाणाहून पसार झाले. त्यानंतर स्थानिकांनी तात्काळ देशपांडे यांना हिंदुजा रुग्णालयात दाखल केले आहे. दरम्यान, देशपांडे यांची प्रकृती गंभीर नसल्याचं डॉक्टरांकडून सांगितलं जात आहे.