एक हजाराहून अधिक हिंदूंचे धर्मांतर केल्याच्या आरोपाखाली UP ATS कडून दोन मौलवींना अटक

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

लखनऊ । लखनऊमध्ये धर्मांतर करुन घेणार्‍या दोन मौलवींना यूपी एटीएस (UP ATS) ने अटक केली आहे. या दोघांवर आतापर्यंत एक हजाराहून अधिक गरीब हिंदूंचे धर्मांतर (Conversion) केल्याचा आरोप आहे. या संदर्भात, यूपीचे एडीजी (कायदा आणि सुव्यवस्था) प्रशांत कुमार (Prashant Kumar) म्हणाले की,”एक मोठी टोळी धर्मांतर करून घेत होती. ते पैसा आणि इतर आमिषे दाखवून धर्मांतर करुन घ्यायचा. या प्रकरणात पहिले नवी दिल्लीतील बाटला हाऊस येथून उमर गौतम याला अटक करण्यात आली. यानंतर त्याचा साथीदार जहांगीर यालाही अटक करण्यात आली आहे. हे दोघे भीती आणि आमिषे दाखवून धर्मांतर करुन घ्यायचे.

इतकेच नव्हे तर पोलिसांनी या प्रकरणात ISI आणि परकीय फंडिंग असल्याचा संशयही व्यक्त केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार हे लोक मोटिवेशनल थॉटच्या माध्यमातून हिंदूंचे धर्मांतर करीत असत. एडीजी (कायदा व सुव्यवस्था) प्रशांत कुमार यांच्या म्हणण्यानुसार, धर्मांतरामुळे लोकांना रेडिकलाइज केले जात होते.

आतापर्यंत एक हजाराहून अधिक लोकांचे धर्मांतर झाले आहेत
एडीजी (कायदा व सुव्यवस्था) प्रशांत कुमार म्हणाले की,” या दोन मौलानांनी आतापर्यंत एक हजाराहून अधिक लोकांचे धर्मांतर केले आहे. त्यांनी मूक-बधिर मुले आणि स्त्रिया यांचे धर्मांतर केले आहे. इतकेच नाही तर महिलांचे धर्मांतर केल्यावर लग्नही लावून दिले गेले आहे.

यूपीसह देशातील अनेक राज्यात आहे जाळे
यूपी एटीएसच्या म्हणण्यानुसार नोएडा, कानपूर, मथुरा आणि देशातील इतर राज्यातही धर्मांतरणाचे काम केले जात आहे. तर उमर गौतम हा देखील हिंदूंमधून इस्लाम कडे वळला आहे. एवढेच नव्हे तर ओमर याने हजाराहून अधिक लोकांना मुस्लिम केले आहे. इस्लामिक दावा सेंटरच्या आदेशानुसार हर धर्मांतर केले गेले आहे. त्याचबरोबर इस्लामिक दावा सेंटर आणि परदेशातूनही या कामासाठी पैसे देण्यात आले आहेत.

राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा

Click Here to Join Our WhatsApp Group

Leave a Comment