मुख्यमंत्री योगी आदित्यनाथांचे घर बॉम्बने उडवण्याची धमकी; सुरक्षा व्यवस्थेत वाढ

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

लखनऊ । उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे लखनऊमधील कालिदास मार्गावरील घर बॉम्बने उडवून देण्याची धमकी आल्यानंतर कालिदास मार्गाची सुरक्षा व्यवस्था वाढविण्यात आली आहे. एका कॉल सेंटरवरून ही धमकी आल्याने खळबळ उडाली आहे. आज तक या वृत्तवाहिनीनं याबाबतच वृत्त दिल आहे. यापूर्वीही त्यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. कॉल सेंटरवरील या धमकीनंतर लखनऊच्या कालिदास मार्गावर हाय अलर्ट घोषित करण्यात आला आहे. ही सुरक्षा वाढवण्याबरोबरच बॉम्ब स्क्वॉड आणि श्वानपथकाच्या मदतीने तपासणी करण्यात येत आहे.

डायल -११२ वर कॉल करून मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे निवासस्थान बॉम्बने उडवून देण्याची धमकी देण्यात आली असल्याचे सांगण्यात येत आहे. फोन करणारा कोण आहे आणि त्या व्यक्तीने कोठून फोन केला आहे, याचा शोध घेण्याचा पोलिस प्रयत्न करीत आहेत. या फोन कॉलची सत्यता काय आहे हे स्पष्ट होईपर्यंत कालिदास मार्गाची सुरक्षा कडक करण्यात आली आहे. कालिदास मार्गावर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याव्यतिरिक्त कॅबिनेट मंत्री श्रीकांत शर्मा आणि इतर काही मंत्र्यांची शासकीय निवासस्थाने आहेत.

काही दिवसांपूर्वीच योगी आदित्यनाथ यांना जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या एका तरुणाला मुंबईतून अटक करण्यात आली होती. कामरान असे या तरुणाचे नाव होते. त्याने उत्तर प्रदेश पोलिसांच्या सोशल मीडिया हेल्प डेस्कवर फोन करुन ही धमकी दिली होती. यानंतर उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्र एटीएसने संयुक्तपणे कारवाई करत कामरानला ताब्यात घेतले होते.

ब्रेकिंग बातम्यासाठी : www.hellomaharashtra.in

 

Leave a Comment