उत्तर प्रदेश वृत्तसंस्था – उत्तर प्रदेशातील बहराइचमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये एका विक्षिप्त पतीने अवैध संबंधांच्या संशयावरुन दाताने पत्नीच्या नाकचे लचके (husband bites wifes nose) तोडले आहेत. या हल्ल्यात पत्नी गंभीर जखमी झाली असून तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. याप्रकरणी आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, सध्या पोलीस फरार आरोपीचा शोध घेत आहेत.
काय घडले नेमके ?
हाती आलेल्या माहितीनुसार, हे प्रकरण बहराइचमधील बेदनापूर, कोतवाली ग्रामीण भागातील आहे. पीडित रजनी देवी बेदनापूर येथील विद्युत विभागात कर्मचारी आहे. रजनीचे पती ज्ञानदत्त पाठकशी भांडण झाले. याच भांडणाचा राग मनात धरून रजनी देवी आपल्या माहेरी निघून गेली. यानंतर माहेरी गलेल्या पत्नीची माफी मागून पतीने तिला घरी परत बोलावले. त्यानंतर आरोपीने त्याच्या दोन साथीदारांसह पत्नीला तिकोरामोडजवळ नेले आणि दाताने पत्नीच्या नाकाचा चावा (husband bites wifes nose) घेतला. यानंतर पत्नीला गंभीर अवस्थेत वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले.
आरोपी पतीने त्याच्या साथीदारांसोबत मिळून रजनी यांच्या नाकाचे लचके तोडले (husband bites wifes nose) आणि जबर मारहाणही केली. पीडित रजनी देवी यांची आई कुसुम तिवारी यांनीआरोपीविरोधात पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी तक्रार नोंदवून फरार आरोपी पतीचा शोध सुरु केला आहे.
हे पण वाचा :
भंडाऱ्यात बर्निंग ट्रकचा थरार, भयानक कारण आले समोर
रस्त्यावरील वळण न दिसल्याने मोटरसायकलचा अपघात; 3 ठार 1 जखमी
दुर्दैवी ! इंद्रायणी नदीत पाण्यात बुडून माय-लेकांचा मृत्यू
अनवाणी पायाने आगीवर धावताना दिसली मुले, धक्कादायक Video आला समोर
वाढत्या कोरोनामुळे शाळा बंद राहणार कि सुरु ?; शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांचे मोठे विधान