हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । चीनने बर्याच प्रमाणात करोना व्हायरसच्या फैलावर नियंत्रण आणलं आहे. चीनमध्ये कोरोना संक्रमणाचे दररोज सरासरी ४० नवीन रुग्णआढळत आहेत, तर ५ हजारहून अधिक लोक रुग्णालयात उपचार घेत आहेत. दरम्यान, कोरोना विषाणूच्या संसर्गाचे केंद्रस्थानी असलेल्या वुहान शहरातील डॉक्टरांनी नवीन चेतावणी दिली आहे. बरे झालेल्या कोरोनाबाधित रुग्णांपैकी सुमारे १० टक्के रुग्णांना पुन्हा कोरोनाचा संसर्ग झाला असल्याचे वुहानमधील डॉक्टरांनी सांगितलं आहे. मात्र, हे कसे घडले याबाबत कुठलंही स्पष्ट कारण त्यांनी सांगितलं आहे.
साउथ चायना मॉर्निंग पोस्टच्या वृत्तानुसार वुहानमधील वैज्ञानिक आणि डॉक्टरांनी सांगितले की, बरे झाल्यावर पुन्हा या लोकांना कोरोना संसर्ग कसा झाला याचा तपास केला जात आहे. डॉक्टरांना हे समजत नाही आहे की, या रुग्णांनी उपचार घेतल्यानंतर त्यांच्या शरीरात अँन्टीबॉडीज विकसित व्हायला हवे होते. मात्र, करोनामुक्त झालेल्या लोकांना पुन्हा संसर्ग होणे ही एक अतिशय चिंताजनक बाब असल्याचे डॉक्टरांनी म्हटलं आहे.
चीनमधील टोंगजी हॉस्पिटलचे अध्यक्ष वांगजी वेई म्हणाले की, त्याच्या रूग्णालयात दाखल झालेल्या कोरोना रूग्णांपैकी ५ ते १० टक्के रुग्णांना पुन्हा कोरोना संसर्ग होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. या व्यतिरिक्त, पीपल्स डेलीच्या हेल्थ जर्नल लाइफ टाईम्सनेही दावा केला आहे की, वुहानमध्ये बरे झालेल्या ५ ते १० टक्के करोना रुग्णांना पुन्हा संसर्ग झाला आहे. या अहवालात वुहानमध्ये राहणाऱ्या कटुंबाचा उल्लेखही केला आहे. या कुटुंबातील करोनातून बरे झालेल्या तिघांना काही दिवसांनी पुन्हा संक्रमण झाल्याची बाब नमूद केली आहे.
या वृत्तानंतर कोरोनासाठी घेण्यात येत असलेल्या चाचणीवरही अनेक तज्ज्ञांनी प्रश्न उपस्थित केले आहेत. विशेष म्हणजे करोनाची पुन्हा लागण झालेल्या लोकांनी असा दावा केला आहे की, बरे झाल्यावर ते कोणत्याही संक्रमित व्यक्तीच्या संपर्कात आले नव्हते. सध्या वुहानच्या रूग्णालयाव्यतिरिक्त, चीनमधील इतरही अनेक रुग्णालयात तपासणी चालू आहे.
ब्रेकिंग बातम्या तुमच्या मोबाईलवर मिळवण्यासाठी 8080944419 या नंबरवर ”Hello News” टाईप करून त्वरित Whatsapp करा.
हे पण वाचा –
मोठी बातमी! गोरगरीब जनता, कामगारांसाठी सरकारची १ लाख ७० हजार कोटींची घोषणा
महाराष्ट्राच्या जायबंदी जनतेला पडलेला को-रोमँटिक प्रश्न – “काय सांगशील ज्ञानदा..?”
धक्कादायक! गेल्या २४ तासात जगभरात २ हजार ३०६ मृत्यू, जाणून घ्या कोणत्या देशात किती रुग्ण ?
एक महिला जिच्यामुळे संपूर्ण देशात पसरला कोरोना व्हायरस
कोरोनाची लागण झालेल्या गर्भवती महिलेच्या मुलासही होऊ शकतो संसर्ग ? जाणून घ्या
‘खरंच…कोरोना विषाणू हवेतून पसरत आहे का? पहा काय म्हणतंय WHO…
सावधान : शरीरात ही ३ लक्षणे दिसल्यास समजून घ्या की आपण कोरोना विषाणूने संक्रमित आहात, जाणून घ्या