नवी दिल्ली । तुम्ही नोकरी करत असाल आणि तुमच्याकडे भविष्य निर्वाह निधी म्हणजेच PF खाते असेल तर तुमच्यासाठी एक महत्त्वाची बातमी आहे. वास्तविक, कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना (EPFO) आपल्या ग्राहकांना घर बसल्या बँक डिटेल्स अपडेट करण्याची परवानगी देते. अशा परिस्थितीत तुम्ही तुमचे बँक खाते आपल्या PF खात्यासह अगदी सहजपणे अपडेट करू शकता.
बँक खात्याची माहिती अपडेट न केल्यामुळे, तुम्ही तुमच्या PF खात्यातून पैसे काढू शकणार नाही. बर्याच वेळा असे घडते की, ग्राहकांकडून PF खात्याशी लिंक केलेले बँक खाते आधीच बंद केले जाते, मात्र ते आपले नवीन बँक खाते PF खात्याशी लिंक करण्यास विसरतात. जर तुमचा जुना किंवा चुकीचा खाते क्रमांक EPFO मध्ये रजिस्टर्ड असेल, तर तुम्ही युनिव्हर्सल अकाउंट नंबर (UAN) द्वारे तुमचे नवीन बँक खाते सहजपणे अपडेट करू शकता.
बँक खात्याचे डिटेल्स कसे अपडेट करायचे ?
>> सर्वप्रथम EPFO च्या अधिकृत युनिफाइड मेंबर पोर्टल https://unifiedportal-mem.epfindia.gov.in/memberinterface/ वर जा.
>> येथे UAN आणि पासवर्ड टाकून लॉग इन करा.
>> आता वरच्या मेनूमधील ‘मॅनेज’ पर्यायावर जा, त्यानंतर ड्रॉप डाउन मेनूमधून ‘KYC’ निवडा.
>> आता तुमची बँक निवडा आणि बँक खाते नंबर, नाव आणि IFSC कोड टाकून ‘Save’ वर क्लिक करा. आता तुमची रिक्वेस्ट KYC Pending for Approval म्हणून दर्शविली जाईल.
>> त्यानंतर संबंधित कागदपत्रे तुमच्या मालकाकडे जमा करा.
>> ही माहिती मालकाने मंजूर केल्यानंतर, तुमचे अपडेट केलेले बँक डिटेल्स डिजिटली मंजूर KYC म्हणून दाखविले जातील.
युनिव्हर्सल अकाउंट नंबर म्हणजे काय ?
युनिव्हर्सल अकाउंट नंबर (UAN) हा 12 अंकी युनिक आयडेंटिफिकेशन नंबर आहे. हा क्रमांक कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटने कडून दिला जातो. विशेष म्हणजे एखाद्या कर्मचाऱ्याने त्याच्या हयातीत नोकरी बदलली तरी त्याचा UAN तसाच राहील.