16 आमदारांच्या अपात्रतेबाबत मोठी अपडेट; या तारखेला सुनावणी?

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या (Eknath Shinde) बंडामुळे शिवसेनेचे दोन तुकडे झाले. खरी शिवसेना कोणाची हा वाद निर्माण झाला आहे. सर्वोच्य न्यायालयाने हे अधिकार विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) याना दिले आहेत. त्यानुसार, येत्या 14 सप्टेंबर रोजी शिवसेनेच्या दोन्ही गटातील आमदारांची सुनावणी होण्याची शक्यता आहे. विधिमंडळाच्या मध्यवर्ती संभागृहात ही सुनावणी होणार आहे.

दोन्ही गटांना पाठवण्यात आली नोटीस

शिवसेनेतील फुटीनंतर 16 आमदारांच्या अपात्रतेचं प्रकरण विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे सोपावण्यात आलं आहे. राहुल नार्वेकर यांना सुप्रीम कोर्टाने या प्रकरणाची लवकरात लवकर सुनावणी घेण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार दोन्ही गटांना लेखी उत्तर लिहून देण्याची नोटीस दिली होती. यानंतर शिंदे गटातील आमदारांनी तब्बल ६ हजार पानांचे लेखी उत्तर विधानसभा अध्यक्षांना पाठवले आहे. या उत्तरांची तसेच पुराव्यांची छाननी करण्यात आली असून विधानसभा अध्यक्षांनी पुढील सुनावणीसाठी उद्धव ठाकरे गट तसेच शिंदे गटातील आमदारांना देखील नोटीस पाठण्यास सुरुवात केली आहे.

कोण आहेत १६ आमदार ?

१६ आमदारांच्या यादीत खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, आरोग्यमंत्री तानाजी सावंत, प्रकाश सुर्वे, बालाजी किणीकर, लता सोनावणे, अनिल बाबर,यामिनी जाधव,संजय शिरसाट,भरत गोगावले, संदीपान भुमरे, अब्दुल सत्तार,महेश शिंदे, चिमणराव पाटील, संजय रायमूलकर, बालाजी कल्याणकर, रमेश बोरणारे या आमदारांचा समावेश आहे.