Upendra Limaye – ‘अ‍ॅनिमल’च्या फ्रेडी पाटीलची साऊथ सिनेइंडस्ट्रीकडून दखल; उपेंद्र लिमयेंना मानाचा पुरस्कार प्रदान

Upendra Limaye
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Upendra Limaye) गेल्यावर्षी १ डिसेंबर २०२३ रोजी प्रदर्शित झालेल्या ‘अ‍ॅनिमल’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर बक्कळ कमाई केली. संदीप रेड्डी वांगा दिग्दर्शित ‘अ‍ॅनिमल’ या सिनेमाने ९०० कोटींचा गल्ला जमवत एक नवा विक्रम तयार केला. या सिनेमाला प्रेक्षकांकडून आणि समीक्षकांकडून प्रचंड प्रेम मिळाले. ‘अ‍ॅनिमल’मध्ये अभिनेता रणबीर कपूर, रश्मिका मंदाना, अनिल कपूर, बॉबी देओल अशी तगडी स्टारकास्ट पहायला मिळाली. या मुख्य कलाकारांशिवाय ‘अ‍ॅनिमल’मधील मराठमोळा फ्रेडी पाटील तुफान चर्चेत आला.

View this post on Instagram

A post shared by Bhairavi Limaye _ Shinde (@bhairavi.u.limaye)

‘अ‍ॅनिमल’ सिनेमात फ्रेडी पाटीलची भूमिका मराठी अभिनेता उपेंद्र लिमये यांनी साकारली आहे. उपेंद्र यांनी ‘अ‍ॅनिमल’ चित्रपटात फक्त १० ते १५ मिनिटांचा कॅमिओ रोल केला आहे. पण त्यांचा हा छोटासा रोल प्रचंड प्रभावी ठरला. त्यांच्या या कॅमिओ रोलने सिनेमात एक वेगळीच मजा आणली आणि प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले. त्यामुळे उपेंद्र लिमये यांची एंट्री ते सिनेमातील त्यांचा वावर फारच चर्चेत राहिला. ‘अ‍ॅनिमल’मध्ये (Upendra Limaye) उपेंद्र यांनी शस्त्रसाठा पुरवणाऱ्या डिलरची म्हणजेच फ्रेडी पाटीलची भूमिका अशी काही वठवली कि त्यांच्या भूमिकेने सर्वांचे लक्ष वेधून घेतले.

(Upendra Limaye) ‘अ‍ॅनिमल’चा हा फ्रेडी पाटील इतका नादखुळा ठरला कि त्याचं क्रेझ साऊथपर्यंत कायम राहिलं. उपेंद्र लिमयेंनी साकारलेल्या फ्रेडी पाटीलच्या एंट्रीचे सीन्स सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होताना दिसले. इतक्या लक्षवेधी आणि प्रभावी कामाची दखल साऊथ सिनेविश्वाने देखील घेतली. ‘इंडियन फिल्म मेकर्स असोसिएशन ऑफ आंध्र प्रदेश’ यांनी उपेंद्र यांच्या कामाची दखल घेऊन त्यांचा सन्मान केल्याची माहिती स्वतः अभिनेत्याने सोशल मीडियाच्या माध्यमातून दिली आहे. उपेंद्र लिमये यांना तिरुपती येथे ‘सर्वोत्कृष्ट आयकॉनिक अभिनेता’ हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.

या पुरस्कार सोहळ्याची एक खास झलक अभिनेत्याने अधिकृत सोशल मीडिया हॅण्डल इंस्टाग्रामवर शेअर केली आहे. ज्याच्या कॅप्शनमध्ये त्यांनी लिहिलंय, ‘ ”अ‍ॅनिमल” तेलगू – तिरुपती येथे आयकॉनिक अभिनेता या पुरस्काराने सन्मान’. (Upendra Limaye) उपेंद्र यांनी शेअर केलेल्या या पोस्टवर नेटकरी आणि चाहते अभिनंदनाचा वर्षाव करताना दिसत आहेत. माहितीनुसार, ‘अ‍ॅनिमल’नंतर लवकरच ‘मडगाव एक्स्प्रेस’ या नव्या बॉलीवूड चित्रपटातून उपेंद्र लिमये पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. आता त्यांचे चाहते या सिनेमाची आतुरतेने वाट पाहत आहेत.