UPI Payments Apps | UPI ॲप्सला टक्कर देण्यासाठी येणार नवीन विदेशी ॲप्स, केंद्र सरकारने घेतला मोठा निर्णय

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | UPI Payments Apps आपल्या भारतातील आता जवळपास सगळे व्यवहारे डिजिटल माध्यमातून होतात. डिजिटल माध्यमातून Google Pay आणि Phone Pay यांचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. UPI म्हणजेच युनिफाईड पेमेंट इंटरफेस (UPI Payments Apps) आणि याच प्रणालीवर स्टार्टअप करण्यात यासाठी केंद्र सरकार लक्ष केंद्रित करत आहे. गेल्या काही वर्षात अनेक यूपीआय ॲप्सने भारतामध्ये एन्ट्री केलेली आहे. त्यामुळे आता केंद्र सरकार देखील भर देणार आहे. एनपीसीआयने आता क्रेड, फ्लिपकार्ड, फॅम पे, ॲमेझॉन पे यांसारख्या ॲप्स एक्झिक्यूटिव्हची भेट देण्याची तयारी चालू केलेली आहे. सध्या भारतामध्ये गुगल पे आणि फोन पे हे दोन ॲप्स मोठ्या प्रमाणावर वापरले जात आहेत. परंतु आता इतर ॲप्सवरही लोकांचे लक्ष जावे. यासाठी इतर कंपन्यांचा देशातील बाजारातील हिस्सा वाढवण्याचा विचार केंद्र सरकार करत आहे.

Phone Pay आणि Google Pay चे जास्त शेअर | UPI Payments Apps

सध्या मार्केटमध्ये गुगल पे आणि फोन पे यांचे जवळपास 86% शेअर आहेत. कारण भारतातील बहुतेक युजर्स हेच ॲप वापरतात. पेटीएम देखील लोकप्रिय होते. परंतु पेटीएमचा हिस्सा देखील अचानक कमी झाला. 2023 च्या शेवटी पेटीएमचा मार्केटमधील शेअर 13 टक्के एवढा होता. परंतु तो आता 9.1% ने कमी झालेला आहे. आता मार्केटमध्ये इतर ॲप्सचा वाटा देखील वाढला पाहिजे अशी एनपीसीआयची इच्छा आहे.

मार्केट शेअर वाढवण्याचा घेणार निर्णय

सध्या एनपीसीआय हे इतर कंपन्याचे मार्केट शेअर देखील कसे वाढतील? याचा विचार करत आहेत. त्याचप्रमाणे यासाठी काही प्रमाणात सूट देखील दिली जाऊ शकते. युजर्स नवीन ॲप्स पेमेंटला कशी चालना देतील आणि किती युजर्स त्यांच्यासोबत जोडतील. हे पाहणे देखील आता महत्त्वाचे ठरणार आहे.