दिल्ली प्रतिनिधी
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेक नेते पक्षांतर करतात तर यामध्ये सेलिब्रिटी सुद्धा मागे नाहीत. काही दिवसांपूर्वी खेळाडू गौतम गँभीर ने भाजप मध्ये प्रवेश केला आहे. तर आज दिल्लीत उर्मिला मातोंडकर या अभिनेत्रीने राहुल गांधी यांच्या उपस्थितीत सक्रिय राजकारणात काँग्रेस पक्षात प्रवेश केला.
पक्ष प्रवेश केल्यानंतर त्यांना उत्तर मुंबई या मतदारसंघातुन लोकसभा निवडणूक लढविण्याची विनंती करण्यात आली. यावर त्यांनी अजून कोणती प्रतिक्रिया दिली नसून मातोंडकर या उत्तर मुंबईतुन लोकसभा निवडणूक लढवू शकतात.
त्यांच्या या प्रवेशासाठी काँग्रेस माजी मुंबई अध्यक्ष संजय निरुपम यांनी उर्मिला यांच्यासह दिल्ली गाठली.
पक्ष प्रवेशानंतर मातोंडकर या म्हणाल्या काँग्रेस पक्षात निवडणुकीच्या तोंडावर प्रवेश केला नसून पूर्वी पासूनच आमच्या घराण्यावर गांधी आणि नेहरू घराण्याचा प्रभाव होता. तसेच निवडणुकीनंतर सुद्धा आपण काँग्रेसमध्ये राहत असल्याचं स्पष्ट केलं.