Thursday, March 30, 2023

काँग्रेस पक्षाबद्दल माझी कोणतीही तक्रार नाही ; उर्मिला मातोंडकर यांचे स्पष्टीकरण

- Advertisement -

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांनी आज शिवसेना पक्षप्रमुख मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. यानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका मांडली. यावेळी विधानपरिषदेसाठी राज्यपाल नियुक्त आमदार कोट्यातून काँग्रेसने दिलेल्या प्रस्तावाबद्दल त्यांना विचारण्यात आले. यावर बोलताना त्यांनी काँग्रेस पक्षाबद्दल आपली कोणतीही तक्रार नाही हे स्पष्ट केलं.

विधानपरिषदेसाठी राज्यपाल नियुक्त आमदार कोट्यातून काँग्रेसने दिलेल्या प्रस्तावाबद्दल त्यांना विचारण्यात आले. यावर बोलताना, त्यांनी काँग्रेसबद्दल कुठलीही तक्रार नाही. तसेच, कुठल्या पदाचाही मुद्दा नव्हता. माझ्या वेगळ्या कारणांमुळे मी काँग्रेसचा प्रस्ताव नाकारला, असे मातोंडकर म्हणाल्या. मात्र हे वेगळं कारण काय आहे, यावर भाष्य करणे त्यांनी टाळले.

- Advertisement -

मला काँग्रेसमध्ये चांगली वागणूक मिळाली. माझी त्यांच्याबद्दल कुठलीही तक्रार नाही. लोकसभा लढवताना प्रचार करताना ज्या गोष्टी व्हायला पाहिजे होत्या त्या झाल्या नाहीत. त्यामुळे मी निवडणूक हरले. माझी पक्षाबद्दल कुठलीही तक्रार नाही असेही त्या म्हणाल्या. तसेच काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी, माजी अध्यक्ष राहुल गांधी यांच्याबद्द्ल आदर असल्याचाही पुनरुच्चार त्यांनी केला. तसेच, महाराष्ट्रातील बाळासाहेब थोरात चांगले नेते असल्याचेही त्या म्हणाल्या.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’