खरंच कोरोना व्हायरस सूर्यप्रकाशात नष्ट होतो? अमेरिकी शास्त्रज्ञांचा मोठा दावा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

वृत्तसंस्था । कोरोना व्हायरसने संपूर्ण जगात थैमान घातलं आहे. या महामारीला निकालात काढण्यासाठी संपूर्ण जग निकाराची लढाई लढत आहे. या महामारीला जगातून हद्दपार करण्यासाठी असंख्य संशोधक या कोरोना व्हायरसच्या सखोलअभ्यासात गुंतले आहेत. दरम्यान, भय आणि अनिच्छतेच्या वातावरण कोरोना व्हायरसबाबतचे रोज नवे दावे समोर येत आहेत. असाच एक दावा अमेरिकेतील शास्त्रज्ञांनी केला आहे. कोरोनाचा व्हायरस सूर्यप्रकाशात लगेच नष्ट होतो असा दावा अमेरिकेच्या डिपार्टमेंट ऑफ होमलँड सेक्युरिटीच्या शास्त्रज्ञांनी केला आहे. मात्र, याबाबतचा रिसर्च अद्याप सार्वजनिक करण्यात आलेला नाही आहे.

डोनाल्ड ट्रम्प यांनीही या संशोधनावर बोलताना आद्रर्ता आणि सूर्यप्रकाश करोनाचा खात्मा करतं असं सांगितलं आहे. “डिपार्टमेंट ऑफ होमलँड सेक्युरिटीच्या शास्त्रज्ञांनी एक रिपोर्ट दिला असून त्यानुसार व्हायरस वेगवेगळ्या तापमान, हवामान आणि पृष्ठभागावर कसा रिऍक्ट होतो याबद्दल माहिती दिली आहे”. “नव्या संशोधनानुसार, व्हायरस थंड आणि कोरड्या वातावरणात जास्त काळ टिकतो. तर दुसरकीडे उबदार आणि आर्द्रता असलेल्या वातावरण कमी वेळ टिकतो,” अशी माहिती डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली आहे.

खरंच कोरोना व्हायरस सूर्यप्रकाशात नष्ट होतो?
होमलँड सिक्युरिटी सेक्रेटरी विभागाचे विज्ञान आणि तंत्रज्ञान सल्लागार विल्यम ब्रायन यांनी दिलेल्या माहितीनुसार,सरकारी शास्त्रज्ञांनी अल्ट्राव्हायोलेट किरणांचा विषाणूंवर परिणाम होत असल्याचा शोध लावला आहे. यामुळे उन्हाळ्यात कोरोनाचा फैलाव कमी होईल अशी आशा निर्माण झाली आहे. आतापर्यंतचा सर्वात मोठं निरीक्षण करताना सूर्याची किरणं जमीन आणि हवेत दोन्हीकडे विषाणूंचा खात्मा करत असल्याचं लक्षात आलं आहे अशी माहिती त्यांनी दिली. तापमान आणि आर्द्रता अशा दोन्ही वेळेला आम्ही पाहणी केली असता तोच परिणाम होत असल्याचं आमच्या लक्षात आलं. तापमान आणि आर्द्रता वाढवणं करोनाच्या विषाणूंसाठी कमी अनुकूल आहे असंही त्यांनी सांगितलं आहे.

मात्र अद्याप हा रिसर्च सार्वजनिक करण्यात आलेला नाही. समिक्षा करण्यासाठी हा रिसर्च पाठवण्यात येणार आहे. यानंतरच तज्ज्ञ हा दावा कितपत खरा आहे याबद्दल सांगतील. अल्ट्राव्हायोलेट किरणांमध्ये निर्जंतुकीकरण प्रभाव असल्याचा दावा याआधी करण्यात आला आहे. तसंच प्रयोग करताना अल्ट्राव्हायोलेट किरणांची तीव्रता आणि तरंगलांबी कितपत ठेवण्यात आली होती, हा पण महत्त्वाचा प्रश्न उपस्थित केला करण्यात आला आहे. “प्रयोग कसा करण्यात आला आणि निकालाचे निकष काय होते हे पहावं लागेल, असं शास्त्रज्ञांनी म्हटलं आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

20200424_173909.gif

 

Leave a Comment