उत्तम आरोग्यासाठी आहारात फणसाच्या बियांचा करा वापर

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्रा ऑनलाईन । आहारात फणसाचा वापर केला असल्याचे आपण ऐकलं असेल पण फणसाच्या बियांचा वापर हा आहारात केला जाते ते आज पहिल्यांदा ऐकण्यात आले असेल. फणस हा ठराविक भागामध्येच पाहायला मिळतो. त्याचे उत्पन्न हे कोकण भागात जास्त प्रमाणात होते. अनेकदा फणस खाल्ल्यानंतर त्याच्या बीयाअनेकजण फेकून देतात. पण फणसाइतकेच त्याच्या बियांमध्ये पोषणद्रव्यं मुबलक असतात. त्याचा आहारात समावेश करणं फायदेशीर असल्याने वाफवून किंवा भाजून बिया खाल्या जातात. या बिया खाण्याने असे कोणते फायदे होतात हे जाणून घेण्याचा प्रयत्न आपण करूयात ..

उत्तम प्रकारचे स्टार्च मिळते —

आठळ्यांमध्ये स्टार्च उत्तमप्रकारचे आढळते. यामधून शरीराला उर्जा मिळते. वाटीभर वाफवलेल्या बिया खाण्याने पोट भरते.

उत्तम दर्जाचे फायबर मिळते –—

पचनशक्ती मजबूत राहण्यासाठी बियांचा वापर केला जातो. बियांमध्ये चांगल्या दर्जाचे डाएटरी फायबर्स असते. तसेच कॅलरीज अल्प प्रमाणात असतात. त्यामुळे वेट लॉसच्या मिशनवर असणार्‍यांसाठी हा नाश्त्याचा उत्तम पर्याय आहे. रक्तातील कोलेस्ट्रेरॉलची पातळी राखण्यास, हृद्यविकाराचा धोका कमी करण्यास, बद्धकोष्ठतेचा त्रास कमी करण्यास मदत होते.

मिनरल्सचा पुरवठा करतात —

बियांमधून मॅग्नीज, मॅग्नेशियम यासारखे मिनरल्स मिळतात. या दोन्ही प्रकारच्या मिनरल्समुळे हाडांना बळकटी मिळते.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’