आरबीआयचे पैसे लसीकरणासाठी वापरा; रोहित पवारांचा केंद्र सरकारला सल्ला

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | लसींच्या तुटवड्यामुळे देशातील लसीकरणाची मोहीम ठप्प झाली आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी केंद्र सरकारला एक महत्त्वाचा सल्ला दिला आहे. देशाला लसीकरणाची सर्वात जास्त गरज असल्याने आरबीआयकडून मिळालेले अतिरिक्त ९९ हजार कोटी त्यासाठी वापरावे असा सल्ला र रोहित पवार यांनी केंद्र सरकारला दिला आहे.

व्यापक लस निर्मिती आणि वितरण कार्यक्रम हाती घेऊन देशाला कोरोनाच्या संकटातून बाहेर काढावे. त्यासाठी बजेटमध्ये केलेली 35 हजार कोटी रुपयांची तरतूद आणि रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून मिळालेले अतिरिक्त 99 हजार कोटी रुपये या कार्यक्रमासाठी वापरता येतील, असा सल्ला रोहित पवार यांनी केंद्राला दिला आहे.

“राज्ये स्वतःच्या पायावर उभी राहिली तर देश उभा राहील. त्यासाठी राज्याची लोकसंख्या, तिथं करोनाचा झालेला प्रादुर्भाव आणि जीएसटीमध्ये संबंधित राज्याचा वाटा यानुसार राज्यांना देण्यात येणाऱ्या निधीचं प्रमाण ठरवावं. असं केलं तर करोनावर आपण लवकर नियंत्रण मिळवू शकू.”

दरम्यान, आरबीआयने केंद्र सरकारला 99122 कोटी रुपयांचा सरप्लस निधी देण्याचा निर्णय घेतला आहे. आरबीआयच्या सेंट्रल बोर्डाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे केंद्र सरकारला हा मोठा निधी मिळणार आहे. जुलै 2020 पासून ते मार्च 2021 पर्यंतची ही सरप्लस रक्कम केंद्र सरकारकडे जमा करण्यात येणार आहे.

ब्रेकिंग बातम्या सर्वांत अगोदर मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा 9028429273 हा नंबर तुमच्याकडील WhatsApp ग्रुपला Add करा.

Leave a Comment