Sunday, January 29, 2023

पावसाळ्यात कडुलिंबाच्या वापराने होतात ‘हे’ फायदे

- Advertisement -

हॅलो महाराष्ट्रा ऑनलाईन। पावसाळा सुरू झाला की अनेक समस्या निर्माण होतात हवेत झालेल्या बदलामुळे अनेक वेळा वेगवेगळे आजार अनुभवायला मिळतात. कडुलिंब हे औषधी वनस्पती आहे . त्याचा वापर फक्त औषधे बनवण्यासाठी केला जात नाही तर त्याचा वापर अनेक वेळा आपल्या त्वचेसाठी सुद्धा केला जातो . कडुलिंब याच्या वापराने त्वचा मऊ आणि मुलायम होते. त्वचेच्या वेगवेगळया आजारांवर कडुलिंबाच्या उपयोग केला जातो. अनेक त्वचेसाठी बाजारात उपलब्ध असणाऱ्या प्रॉडक्ट मध्ये सुद्धा लिंबाचा वापर केला जातो. बाजारात अनेक लिंबाचे फेसपॅक तयार आहेत . परंतु घरात तयार केलेल्या कडुलिंबाच्या फेसपॅक बदल सांगणार आहोत. घरी बनवलेल्या फेस पॅक हे हवेतील बॅक्टरीया आणि काही वायरस इन्फेकॅशन पासून आपल्या त्वचेचे रक्षण करते. हा कडुलिंबाच्या फेसपॅक कसा तयार केला जातो याची माहिती घेऊया.

साहित्य —

- Advertisement -

दोन ते तीन चमचे कडुलिंबाच्या पानांची पूड त्यानंतर त्यामध्ये एक चमचा इतके गुलाबपाणी घाला त्यानंतर थोडा वेळ तसेच ठेवल्यानंतर अर्धा चमचा लिंबाचा रस घाला . अर्धा तास ते मिश्रण तयार करून ठेवा . चेहरा स्वच्छ पाण्याने धुवून त्यावर हे फेसपॅक लावा सुकल्यानंतर हा थंड पाण्याने धुवून टाका.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’