‘आम्हाला संपविण्याची भाषा वापरणे हे अपरिपक्वतेचे लक्षण’ – खासदार संजयकाका पाटील

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सांगली प्रतिनिधी । आमचं राजकीय जीवन संघर्षाचे आहे. संघर्ष आम्हाला नवा नाही. कोणाला संपविण्याचा विषय नाही. दोन वर्षात आम्हाला संपविण्याची भाषा वापरणे हे अपरिपक्वतेचे लक्षण आहे. बालिशपणे टोकाला गेले आहेत. लोकांच्या टाळ्या मिळविण्यासाठी बोलले असतील. मी त्यांच्या बोलण्याला महत्व देत नाही. असा टोला खासदार संजय काका पाटील यांनी युवानेते रोहीत पाटील यांचे नांव न घेता पत्रकार बैठकीत लगावला.

कवठेमहांकाळ नगरपंचायतीच्या पंचवार्षिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे युवानेते रोहित पाटील यांच्या टिकेवर खासदार संजय पाटील यांनी पत्रकार बैठकीत सांगितले. यावेळी माजी राज्यमंत्री अजितराव घोरपडे, अनिता सगरे, गजानन कोठावळे उपस्थित होते. यावेळी बोलताना संजयकाका म्हणाले, शहराच्या गतीमान विकासासाठी एकत्र आलो आहोत.

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीवर अन्याय केल्याचे सांगितले जात आहे. मग राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या अनिता सगरे व माजी बांधकाम सभापती गजानन कोठावळे हे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नाहीत काय? असा सवाल खासदार संजय पाटील यांनी विचारला. त्यामुळे कोणावर अन्याय करण्याचा अथवा डावलण्याचा प्रश्नच नाही. आमच्यावर बेमालूमपणे आरोप करीत आहेत. असा स्पष्ट खुलासा खासदार संजय पाटील यांनी केला.

Leave a Comment