नवी दिल्ली | न्यायमूर्ती एन वी रामण्णा देशाचे पुढील मुख्य न्यायमूर्ती होणार आहेत. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी त्याच्या नावाला परवानगी दिली आहे. सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश एस ए बोबडे यांनी न्यायमूर्ती एन वी रामण्णा यांच्या नावाची शिफारस राष्ट्रपतींच्याकडे केली होती.
मुख्य न्यायाधीश एस ए बोबडे हे 23 एप्रिल रोजी रिटायर्ड होत आहेत. 24 एप्रिल रोजी न्यायमूर्ती रामण्णा हे मुख्य न्यायाधीश पदाची शपथ घेतील. न्यायमूर्ती रामण्णा यांची साल 2014 मध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायधिश पदी निवड झाली होती. न्यायमूर्ती रामण्णा हे 26 ऑगस्ट 2022 रोजी सेवानिवृत्त होणार आहेत.
न्यायमूर्ती रामण्णा यांचा जन्म 28 ऑगस्ट 1957 रोजी आंध्र प्रदेशातील कृष्ण जिल्ह्यातील पोंनवरम या गावी एका शेतकरी कुटुंबात झाला. त्यांनी 1983 मध्ये वकिली व्यवसाय सुरू केला. 27 जून 2000 मध्ये न्यायमूर्ती रामण्णा यांची आंध्रा प्रदेश हायकोर्टच्या स्थायी न्यायाधीशपदी नियुक्ती झाली होती. साल 2013 मध्ये ते दिल्ली उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश झाले.