हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | गोवा विधानसभा निवडणुकीत दिवंगत भाजप नेते मनोहर पर्रीकर यांचे सुपुत्र उत्पल पर्रीकर हे पणजी मतदार संघातुन अपक्ष निवडणूक लढणार आहेत. उत्पल पर्रीकर याना भाजपकडून उमेदवारीं मिळाली नव्हती त्यानंतर त्यांनी इतर कोणत्या पक्षात जाण्यापेक्षा अपक्ष लढण्याचा निर्णय घेतला आहे.
माझ्या वडिलांनी पक्ष मजबूत केला. मात्र तरीही मला पणजीतून उमेदवारी दिली नाही. केवळ संधी साधुला तिकीट दिलं आहे. दोन वर्षापूर्वी पक्षात आलेल्यांना तिकीट दिलं. त्यामुळे मी पणजीतून अपक्ष म्हणून लढणार आहे’, अशी घोषणा उत्पल पर्रीकर यांनी आज केलीय.
I will be contesting as an Independent candidate from Panaji constituency: Utpal Parrikar, son of late former CM Manohar Parrikar#GoaElections pic.twitter.com/FsBomEeRwk
— ANI (@ANI) January 21, 2022
भाजपा आणि अपक्ष हे दोन मार्ग माझ्याकडे होते. भाजपाने उमेदवारी न दिल्यामुळे अपक्ष अर्ज केला आहे. मनोहर पर्रिकरांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी निर्णय घेतला आहे. मला कोणत्याही मंत्रिपदाची वगैरे अपेक्षा नाही असे उत्पल पर्रीकर यांनी स्पष्ट केले.