लखनऊ : वृत्तसंस्था – लोकलमध्ये फोर्थ सीट, ऑटोमध्ये चौथी सिट, टमटम मध्ये दहा ते बारा सीट भारतीय प्रवाशांना एडजस्टमेंट करायची सवयच असते. मात्र, या सगळ्या एडजस्टमेंटचा रेकॉर्ड उत्तर प्रदेशात मोडण्यात आला आहे. या ठिकाणी एका ऑटो रिक्षामधून एक दोन नव्हे तर तब्बल 27 जण (27 passengers travelling in one auto) उतरले आहे. हे सर्व जण ऑटोमधून उतरत असताना त्यांची मोजणी करता करता पोलीसदेखील थकले. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. एवढे जण या रिक्षात बसले कसे काय? असा प्रश्न हा व्हिडिओ पाहून सर्वांना पडला आहे.
ऑटो रिक्षामधून उतरले तब्बल 27 जण; मोजताना पोलिसदेखील झाले हैराण pic.twitter.com/UzKFvA2bw4
— Ajay Rajaram Ubhe (@RajaramUbhe) July 12, 2022
उत्तर प्रदेशच्या फतेहपूर जिल्ह्यातील ही घटना आहे. बिंदकीमधील ललौली चौकात एका ऑटोला पोलिसांनी थांबवलं. हा ऑटोचालक भरधाव वेगाने ऑटो चालवत होता. पोलिसांनी ऑटोचा पाठलाग करून ऑटो थांबवली. त्यानंतर त्यातील प्रवाशांना बाहेर काढलं. त्यांनी ऑटोतील प्रवासी मोजले, तेव्हा चक्रावलेच. ऑटोचालकासह तब्बल 27 प्रवासी या ऑटोत (27 passengers travelling in one auto) होते. यानंतर पोलिसांनी ऑटोचालकावर तात्काळ कारवाई केली. पोलिसांनी ऑटो जप्त केली आहे. ऑटोचालकाकडून 11 हजारांचं चालान घेण्यात आले.
ज्यावेळी पोलीस ऑटोतून प्रवाशांना खाली उतरवत होते, तेव्हा त्या ठिकाणी उपस्थित असलेल्या एका व्यक्तीने हि घटना आपल्या मोबाईलमध्ये कैद केली. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. एका ऑटो रिक्षात 27 जण (27 passengers travelling in one auto) कसे बसले असतील याचीच चर्चा सर्वत्र रंगली आहे. या व्हिडिओवर लोकांच्या मजेशीर कमेंट येत आहेत.
हे पण वाचा :
“देवेंद्रजी मुख्यमंत्री होणार नाहीत, मला माहिती होतं”, अमृता फडणवीस यांचे मोठे विधान
आमदार शहाजी बापू पाटील यांनी कार्यकर्त्यांसोबत धरला ठेका, सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल
खरे खंडणी बहाद्दर राष्ट्रवादीचे शशिकांत शिंदे : आ. महेश शिंदे
नांदेडमध्ये खंडणीप्रकरणी काँग्रेस नगरसेवकाच्या मुलाला अटक, तर शिवसेनेचा माजी नगरसेवक फरार