उत्तरप्रदेशात बस आणि ट्रकचा भीषण अपघात;२० जणांचा आगीत होरपळून मृत्यू

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

टीम हॅलो महाराष्ट्र । उत्तर प्रदेशातील कन्नौज इथं शुक्रवारी रात्री जीटी रोड महामार्गावर बस आणि ट्रकची धडक झाली. या भीषण अपघातात २० प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला आहे. बसमध्ये ४५ प्रवाशी होते. त्यातील २० जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे.

याबाबत मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार फरुखाबादहून जयपूरला जाणाऱ्या बसचा घिलोई गावाजवळ अपघात झाला. या अपघातानंतर बसला आग लागली. दुर्घटनेतील जखमींनी रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून बस पूर्णपणे जळून खाक झाली आहे. यामध्ये १८ ते २० जणांचा होरपळून मृत्यू झाला. आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलं. घटनास्थळावर परिस्थिती इतकी भीषण आहे की, मृतदेह छिन्नविछिन्न झाले असून त्यांची ओळख डीएनए चाचणी केल्यानंतरच पटवता येईल.

अपघातानंतर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी परिस्थितीची माहिती घेतली. त्यानंतर घटनास्थळी जिल्हाधिकारी आणि पोलिस अधिकक्षकांना भेट देण्यास सांगितलं आहे. तसेच जखमींना तात्काळ वैदकिय मदत देण्याचे आदेश दिले आहेत. पंतप्रधान मोदींनी ही ट्विट द्वारे हि घटना दुर्दैवी असल्याचं म्हंटल आहे.