नवी दिल्ली । संपूर्ण देशभरात उत्तर प्रदेशातील हाथरस सामूहिक बलात्कार घटनेवरुन संताप व्यक्त केला जात आहे. दरम्यान या प्रकरणाची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अखेर दखल घेतली. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याशी चर्चा केली आहे. योगी आदित्यनाथ यांनीच ट्विट करत ही माहिती दिली आहे. नरेंद्र मोदींनी आरोपींविरोधात कठोर कारवाई करण्यास सांगितलं असल्याची माहिती योगी आदित्यनाथ यांनी दिली आहे.
योगी आदित्यनाथ यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे की, “पंतप्रधान नरेंद्र मोदींनी माझ्यासोबत हाथरस घटनेवरुन संवाद साधवा. आरोपींविरोधात कठोर कारवाई झाली पाहिजे असं यावेळी त्यांनी सांगितलं”. योगी आदित्यनाथ यांनी घटनेचा तपास करण्यासाठी विशेष तपास पथक तयार करण्यात आलं असल्याची माहिती दिली.
आदरणीय प्रधानमंत्री श्री @narendramodi जी ने हाथरस की घटना पर वार्ता की है और कहा है कि दोषियों के विरुद्ध कठोरतम कार्रवाई की जाए।
— Yogi Adityanath (@myogiadityanath) September 30, 2020
योगी आदित्यनाथ यांनी दिलेल्या माहितीनुसार, “हाथरस सामूहिक बलात्कारातील आरोपींना सोडलं जाणार नाही. घटनेचा तपास करण्यासाठी विशेष तपास पथक तयार करण्यात आलं आहे. हे पथक ७ दिवसांत रिपोर्ट सादर करेल. न्याय मिळावा यासाठी फास्ट ट्रॅक कोर्टात सुनावणी होईल”.
हाथरस में बालिका के साथ घटित दुर्भाग्यपूर्ण घटना के दोषी कतई नहीं बचेंगे।
प्रकरण की जांच हेतु विशेष जांच दल का गठन किया गया है। यह दल आगामी सात दिवस में अपनी रिपोर्ट देगा।
त्वरित न्याय सुनिश्चित करने हेतु इस प्रकरण का मुकदमा फास्ट ट्रैक कोर्ट में चलेगा।
— Yogi Adityanath (@myogiadityanath) September 30, 2020
संशयास्पद! युपी पोलिसांनी बळजबरीने केले पीडितेच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार
उत्तर प्रदेशच्या हाथरसमधील सामूहिक अत्याचार प्रकरणातील 19 वर्षीय पीडितेचा मंगळवारी सकाळी दिल्लीच्या सफदरजंग हॉस्पिटलमध्ये मृत्यू झाला. मृत्यूनंतर पीडितेच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार तिच्या परिवाराचं म्हणणं न ऐकता युपी पोलिसांनीच बळजबरीने मध्यरात्री ३ वाजता केले. पोलिसांना वारंवार पार्थिव घरी आणला जावा यासाठी विनंती केली जात होती, मात्र त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केलं असा आरोप कुटुंबाने केला आहे. पीडितेच्या भावाने माध्यमांना दिलेल्या माहितीनुसार, “माझ्या बहिणीवर अंत्यसंस्कार करण्यात आले असं दिसतंय. पोलीस आम्हाला काहीच माहिती देत नाहीयेत. अखेरचं एकदा तिचा मृतदेह घरी आणला जावा यासाठी आम्ही त्यांना वारंवार विनंती करत होतो, पण त्यांनी ऐकलं नाही”.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.