उत्तराखंडमधील आज्जीबाईंनी राहुल गांधींच्या नावावर केली सगळी संपत्ती

0
68
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या नावावर उत्तराखंडमधील एका 78 वर्षीय महिलेनं आपली सगळी संपत्ती केलीय! यामध्ये 50 लाखाची मालमत्ता आणि 10 तोळे सोनं यांचा समावेश आहे. राहुल गांधी आणि त्यांचे विचार देशासाठी आवश्यक असल्याचं या महिलेनं म्हटलं आहे. स्वातंत्र्यापासून आजपर्यंत गांधी कुटुंबाने नेहमीच देशासाठी सर्वोच्च बलिदान दिलं आहे. या देशाच्या एकता आणि अखंडतेसाठी त्यांनी आपल्या प्राणांची आहुती दिली आहे.

देहरादूनमधील रहिवासी पुष्पा मुंजियाल यांनी राहुल गांधींना आपल्या सर्व संपत्तीचं मालक बनवलं. त्यांनी देहरादून कोर्टात राहुल गांधी यांना मालकी हक्काचं मृत्यूपत्र सादर केलंय. राहुल गांधींच्या विचारांनी प्रभावित झाल्याचं पुष्पा मुन्जियाल यांनी सांगितलं. त्यामुळेच संपूर्ण संपत्ती राहुल यांच्या नावावर करण्याचा निर्णय घेतल्याचं त्या म्हणाल्या.

कोण आहेत या आज्जी बाई-
पुष्पा मुंजियाल या शाळेत शिक्षिका होत्या. आपल्या निवृत्तीच्या दोन वर्ष आधी त्यांनी व्हीआरएस घेतली होती. पण 1998 मध्ये एका दुर्घटनेत त्यांची दृष्टी गेली. त्यानंतर त्या काही काळ आपल्या बहिणींसोबत राहत होत्या. परंतु आपण आपल्या नातेवाईकांवर ओझं बनत असल्याची भावना त्यांच्या मनात निर्माण झाली. यामुळे त्यांनी देहरादूनच्या डालनवालामधील प्रेम धाम वृद्धश्रमात राहण्याचा निर्णय घेतला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here