ही महाराष्ट्राची संस्कृती नाही; राज्यपालांच्या टिकेवरून आशिष शेलारांची प्रतिक्रिया

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिवसेना नेते संजय राऊत यांनी आज भाजपवर निशाणा साधला. यावेळी संजय राऊतांनी राज्यपालांवरही टीका केली. या टिकेवरून भाजपकडून नाराजी व्यक्त केली जात आहे. दरम्यान, भाजप नेते आशिष शेलार यांनी राऊतांवर निशाणा साधला असून “हि भाषा राऊतांना शिबत नाही. ही महाराष्ट्राची संस्कृती नाही”, असे शेलार यांनी म्हंटले.

आशिष शेलार यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले कि, संजय राऊत यांनी आज महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्यावर टीका केली. त्यांनी जी काही विधाने राज्यपालांच्या विषयी केलेली आहेत. अशी विधाने तसेच भाषा संजय राऊत यांना शोभत नाही. हि महाराष्ट्राची संस्कृती नाही.

काय म्हणाले संजय राऊत ?

राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी विद्यापाठात कुलगुरूंची नियुक्ती करण्यास सुरुवात केली आहे. त्यावरून शिवसेना नेते संजय राऊत यांनी पुन्हा एकदा राज्यपालांवर निशाणा साधला. राज्यपालांवर टीका करताना राऊत म्हणाले की, आम्ही संघर्ष करत नाही. त्यांना खाजवायची सवय पडलीय. त्यांची खाज कधी संपेल माहीत नाही. पण एवढीपण खाज बरी नाही,” असे राऊत यांनी म्हंटले.