औरंगाबाद : 18 वर्षावरील नागरिकांकडून लसीकरणासाठी जोरदार प्रतिसाद मिळत आहे. तसेच रविवारी महापालिकेला लसींचा नवीन साठा उपलब्ध झाला, परंतु केवळ 12 हजार लसीच मिळाल्या आहेत. हा साठा एक दिवसच पूरणार असल्याने मंगळवारपासून महापालिकेच्या लसीकरण मोहिमेला ब्रेक लागण्याची शक्यता आहे.
शहरात 22 जून पासून 18 वर्षावरील सर्व नागरिकांना लस देण्यात येत आहे सहा दिवसांपासून 70 केंद्रांवरील लसीकरण सुरू आहे. शनिवारी सकाळी महापालिकेकडे वीस हजार लस शिल्लक होत्या दिवसभरात 18 हजार 148 नागरिकांना लस देण्यात आली. मनपाकडे केवळ दोन हजार लसीचाच साठा शिल्लक होता.
दरम्यान रविवारी महापालिकेला कोविशिल्डचा 12 हजार लसींचा पुरवठा झाला त्यामुळे आता सोमवारी कोविशिल्ड साठी महापालिकेने 79 केंद्रांवर नियोजन केले आहे. तर इतर तीन केंद्रांवर कोव्हॅक्सीन लस उपलब्ध असणार आहे. महापालिकेनेही लस केवळ दुसरा दुसरा डोस घेणाऱ्या नागरिकांसाठीच ठेवली आहे. क्रांती चौक आरोग्य केंद्र, राजनगर आरोग्य केंद्र आणि एमआयटी हॉस्पिटल या तीन ठिकाणी सकाळी 10 ते दुपारी चार वाजेपर्यंत कोव्हॅक्सीन लस घेता येणार आहे.