औरंगाबाद : विदेशात शिक्षण नोकरीसाठी जाणाऱ्या विद्यार्थी नागरिकांना लस घेणे बंधनकारक होते. मात्र, शासनाकडून 18 ते 44 वयोगटाचे लसीकरण बंद केलेले आहे. विद्यार्थी नागरिकांची गंभीर समस्या लक्षात घेऊनमहापालिकेने शासनाच्या परवानगी सह विशेष मोहीम राबवली. मागील तीन दिवसांमध्ये 318 विद्यार्थी नागरिकांचे लसीकरण करण्यात आले आहे.
महापालिकेच्या जटवाडा रोड वरील चेतना नगर, बन्सीलाल नगर आणि औरंगपुरा येथील आरोग्य केंद्रात विदेशात शिक्षणासाठी नोकरीकरिता जाणारे विद्यार्थी आणि नागरिकांसाठी लसीकरण सुरू करण्यात आले या लसीकरण मोहिमेला नागरिक विद्यार्थ्यांनी चांगला प्रतिसाद दिला.18 ते 44 वयोगटातील 318 नागरिकांना लस देण्यात आली.
शनिवारी विदेशात शिक्षणासाठी जाणाऱ्या 69 विद्यार्थ्यांना नागरिकांना लस देण्यात आली. आता लसीचा दुसरा डोस त्यांना 84 दिवसानंतर देण्यात येईल. दोन्ही डोस घेतल्यानंतरच त्यांना विदेशात जाण्याची संधी आहे. मागील दोन ते तीन महिन्यापासून विद्यार्थी शासनाकडे ही बाब म्हणून लस द्यावी अशी मागणी करीत होते. पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांनी या प्रकरणात लक्ष घालून लक्ष देण्याची सूचना केली.