हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | संपूर्ण देशभरात कोरोना लसीकरण मोहिमेला 16 जानेवारी सुरुवात झाली. मात्र, आता या मोहिमेसाठी वापरण्यात येणाऱ्या कोविन नावाच्या ॲपमध्ये तांत्रिक समस्या आल्याने कोरोना लसीकरणाची मोहिम बंद झाली आहे. हा दोष दुरुस्त करण्यासाठी 17 आणि 18 जानेवारी असे 2 दिवस हे लसीकरण बंद राहणार आहे. केंद्र सरकारकडून ही समस्या दूर करण्याचे शर्तीचे प्रयत्न सुरू आहेत.
कोविड लसीकरण करत असताना संपूर्णपणे डिजिटल नोंदणी करणे सक्तीचे आहे. आज तांत्रिक अडचण आली असल्याने ऑफलाईन नोंदी करण्यास परवानगी शासनाने दिली होती. मात्र यापुढील सर्व नोंदी ॲप द्वारेच करण्याचे शासनाचे निर्देश आहेत. ही बाब लक्षात घेता, मुंबईत रविवार दिनांक 17 जानेवारी 2021 आणि सोमवार दिनांक 18 जानेवारी 2021 असे दोन दिवस कोविड 19 लसीकरण स्थगित ठेवण्यात आले आहे.कोविन ॲप पूर्ववत होताच लसीकरण पुन्हा सुरू होणार आहे.
COVID19 vaccination temporarily suspended till 18th January in the entire state of Maharashtra due to technical issues with CoWIN App: State Health Department
— ANI (@ANI) January 16, 2021
दरम्यान, 16 जानेवारीला कोरोना लसीकरणाला प्रारंभ झाला. कोरोना विरुद्धच्या लढाईचा ऐतिहासिक निर्णायक क्षण म्हणून या लसीकरणाकडे पाहिले जात आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वेबिनारच्या माध्यमातून नागरिकांसह देशभरातील लसीकरण केंद्रावरील कर्मचाऱ्यांना उद्देशून भाषण केले. त्यानंतर लसीकरणाला सुरवात झाली.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’