हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । जगभरात कोरोना लसीच्या निर्मितीसाठी सर्व स्तरावर प्रयत्न सुरु आहेत. लवकरात लवकर कोरोनाची लस उपलब्ध व्हावी. कोरोनामुळे मृत्यूचा आकडा जास्त आहे. पुण्यातल्या सिरम इन्स्टिट्यूटने सुद्धा यासाठी प्रयत्न सुरु आहेत.
सिरम इन्स्टिट्यूट ची सुरुवात हा सायरस पूनावाला म्हणजे मॅड पारशी या व्यक्तीने केली आहे. आज जगभर त्यांचे नाव वेगवेगळ्या क्षेत्रांशी निगडित आहे. आहे. आज जगातल्या सर्वोत्तम चित्रांचा खासगी खजिना जोपासणारा, उत्तमोत्तम स्पोर्ट्सकारचा आणि प्रायव्हेट जेटचा मालक म्हणजे सायरस पूनावाला हे आहेत. सायरस पूनावाला यांचा स्टड फार्म हा त्याचा मूळ धंदा होता. त्यांना घोडेवाला या नावाने हि ओळखले जायचे. घोड्यांच्या शर्यती हा त्याचा छंद आणि घोड्यांची पैदास हा व्यवसाय होता. भारतातून ब्रिटिश गेले आणि भारतीयांना घोड्याच्या शर्यतीत फारसं स्वारस्य उरलं नाही. त्यानंतर त्यांचा हा धंदा डबघाईला आला. घोड्यांचा धंदा बंद करण्याचा विचार सायरस पूनावालाने साठच्या दशकातच चालवला होता. दरम्यान त्याने स्पोर्ट्सकार बनवून विकण्याचा दुबळा प्रयत्न केला. पण तेव्हा असल्या शोभादर्शी उद्योगाला अमेरिका आणि युरोपमध्ये वाव होता. भारतात देशी श्रीमंतांची मानसिकता लोकल फ्लॅमबॉयन्स विकसित करण्याची नव्हती.
पूनावाला आपले शर्यतीतून बाद झालेले घोडे हाफकिनला या संस्थेत डोनेट करायचे . लस तयार करण्यासाठी घोड्यांचं रक्त बेस म्हणून वापरलं जातं. डोनेट करता करता पूनावालाने हाफकिनच्या एका पशुंच्या डॉक्टरकडून यातलं माहिती जाणून घेतली. आधुनिक वैद्यकशास्त्रात त्याचे घोडेच त्याला पैसा मिळवून देणार. हे त्यांच्या लक्षात आलं की घोड्याच्या रक्तापासून अँटिटॉक्सिन तयार करण्याच्या जुन्या उद्योगाला त्यांनी आधुनिक विज्ञानाची जोड दिली. १९६६ साली पुण्यात सिरम इन्स्टिट्यूटची पायाभरणी केली. घरचे घोडे होतेच. सिरम इन्स्टिट्यूटने अक्षरशः लशींचा रतीब घालायला सुरुवात केली. १९७४ साली सिरम इन्स्टिट्यूटने घटसर्पावरची एक लस तयार केली. डांग्या खोकल्यावर औषध काढलं. १९८१ साली त्यांची सर्पदंशावरची प्रतिबंधक लस लोकप्रिय झाली. आज १०० हून अधिक देशांत सिरम इन्स्टिट्यूट लशी पुरवतं. जगातल्या प्रत्येक दोन बालकांपैकी एकाला जी लस टोचली जाते ती सिरम इन्स्टिट्यूटची असते असं आत्मविश्वासाने पूनावाला सांगतात. जो व्यक्ती साठच्या दशकात घोडयांचा व्यवसाय करायचा तो माणूस
आज ५० कोटी लसींचे डोस विकत आहे. जगभरात त्यांचे आव मोठे आहे जगभरातील १०० श्रीमंत लोकांच्या यादीत त्यांचा समावेश आहे. तर भारतात चौथ्या क्रमांकाचा श्रीमंत माणूस आहे . पूनावालांची संपत्ती १३ अब्ज डॉलर्स इतकी आहे. सिरम इन्स्टिट्यूटने युरोपातल्या आघाडीच्या दोन कंपन्या विकत घेतल्यात. १० हजार कोटींचा महसूल वर्षाला तयार करणारी ही कंपनी वर्षाला दीड अब्ज डोस तयार करू शकते. म्हणूनच जग संशोधनात कितीही पुढे असलं तरी शेवटी जगाला वाचवणारी लस भारतातच तयार होणार हे नक्की. कारण ऑक्सफर्डची जी लस तयार होते आहे तिच्या उत्पादनाचा करार पुण्यातल्या सिरम इन्स्टिट्यूटसोबत आहे. सायरस पूनावाला यांच्या अनेक शाळा आहेत. त्यातून ते ज्ञान- दानाचे कार्य करतात. अनेक महाविद्यालये उभी केली आहेत. नवी पिढी घडवण्याचे कार्य ते करतात.
महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा 7972630753 हा संपर्क क्रमांक Hello News या नावाने सेव्ह करा. तुमचे नाव आणि जिल्हा आम्हाला इथे कळवा.
ब्रेकिंग बातम्यासाठी : www.hellomaharashtra.in