वडूज नगरपंचायत भाजप की राष्ट्रवादीकडे, निकालानंतरही अस्पष्ट : सत्तेच्या चाव्या अपक्षांकडे

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके

सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्यातील वडूज नगरपंचायतीमध्ये निवडणूक निकालानंतर आता सत्तास्थापनेत मोठा ट्विस्ट निर्माण होणार असल्याचे दिसून येत आहे. वडूज नगरपंचायतीच्या 17 जागांपैकी कोणत्याही पक्षास बहुमत मिळाले नसल्याने आता अपक्ष कोणाच्या हाती सत्ता देणार याकडे जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले आहे. भाजपा की राष्ट्रवादी कोणाची सत्ता येणार हे आता अपक्षांच्या हातात आहे.

वडूज नगरपंचायत भाजपचे आ. जयकुमार गोरे यांच्या गटाला 6 जागांवर विजय मिळाला आहे. सर्वात जास्त जागा या भाजपाला मिळाले आहेत, मात्र या विजयामुळे सत्ता मिळण्यासाठी अजूनही 3 जागांची आवश्यकता भाजपला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस यांना याठिकाणी 5 जागा मिळाल्या तर काँग्रेसला 1 जागा मिळाली आहे. त्याच बरोबर अपक्ष चार उमेदवार निवडून आले आहेत. त्यामुळे 9 चा सत्तास्थापनेचा आकडा गाठण्यासाठी अपक्ष कोणाला मदत करणार यावरती वडूज नगरपंचायत सत्ता कोणाची स्थापन होणार हे ठरणार आहे.

https://www.facebook.com/hellomaharashtra.in/videos/342987960777492/

वडूज नगरपंचायत मध्ये शिवसेनेला एकही जागा मिळाली नाही. त्यामुळे महाविकास आघाडी पॅटर्न राबविला तरी काँग्रेस-राष्ट्रवादी मिळून केवळ 6 जागा होत आहेत. त्यामुळे 4 अपक्ष विजयी उमेदवारांनी पैकी 3 विजयी उमेदवार कोणाचा गळाला लागणार त्याची सत्ता स्थापन होणार हे निश्चित आहे. त्यामुळे नगरपंचायतीच्या सत्तेच्या चाव्या अपक्षांच्या हाती आहेत. तेव्हा भाजप की राष्ट्रवादी सत्ता स्थापन होणार याकडे आता जिल्ह्याचे लक्ष लागणार आहे.

Leave a Comment