हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या फेब्रुवारी महिना (Valentine Week 2023) सुरु असून जगभरातील कपल्स या महिन्याची आतुरतेने वाट पाहत असतात. कारण फेब्रुवारीला प्रेमाचा महिना म्हटले जाते. दरवर्षी 14 फेब्रुवारी या दिवशी व्हॅलेंटाईन डे (Valentine Day) साजरा केला जातो. आणि यापूर्वी 1 आठवडाभर व्हॅलेंटाईन वीक (Valentine Week) साजरा केला जातो. उद्यापासून हा व्हॅलेंटाईन वीक साजरा होत असून यामध्ये रोज डे (Rose Day), प्रपोज डे (Propose Day), चॉकलेट डे (Chocolate Day), टेडी डे (Teddy Day), प्रॉमिस डे (Propose Day), हग डे (Hug Day), किस डे (Kiss Day) साजरे केले जातात. चला आज आपण सविस्तरपणे जाणून घेऊया कोणत्या तारखेला कोणता डे साजरा केला जातो.
पहा संपूर्ण यादी (Valentine Week 2023)-
7 फेब्रुवारी – रोज डे Rose Day
8 फेब्रुवारी – प्रपोज डे Propose Day
9 फेब्रुवारी – चॉकलेट डे Chocolate Day
10 फेब्रुवारी – टेडी डे Teddy Day
11 फेब्रुवारी – प्रॉमिस डे Promise Day
12 फेब्रुवारी – हग डे Hug Day
13 फेब्रुवारी – किस डे Kiss Day
14 फेब्रुवारी – व्हॅलेंटाईन डे Valentine Day
दिवस 1 – रोज डे (7 फेब्रुवारी) Rose Day
‘व्हॅलेंटाईन वीकची सुरुवात ‘रोज डे’ने होते. हा दिवस 7 फेब्रुवारी रोजी साजरा केला जातो. या दिवशी प्रेम करणारे कपल्स एकमेकांना गुलाब देऊन आपलं प्रेम व्यक्त करतात. लाल गुलाब हे प्रेमाचे प्रतीक मानले जाते.
दिवस 2 – प्रपोज डे (8 फेब्रुवारी) Propose Day
व्हॅलेंटाईन वीकचा दुसरा दिवस म्हणजेच 8 फेब्रुवारी हा ‘प्रपोज डे’ म्हणून साजरा केला जातो. या दिवशी लोक त्यांच्या जोडीदाराला, क्रशला किंवा त्यांना ज्यांच्याबद्दल प्रेमाची भावना आहे अशा लोकांना प्रपोज करतात आणि आपलं प्रेम व्यक्त करतात. Valentine Week 2023
दिवस 3 – चॉकलेट डे (9 फेब्रुवारी) Chocolate Day
व्हॅलेंटाईन डेचा तिसरा दिवस ‘चॉकलेट डे’ म्हणूनसाजरा केला जातो. एकमेकांवरचे प्रेम व्यक्त केल्यानंतर आपल्या पार्टनरचे तोंड गोड करण्यासाठी या दिवशी चॉकलेट देऊन हा दिवस साजरा करा. Valentine Week 2023
दिवस 4 – टेडी डे (10 फेब्रुवारी) Teddy Day
व्हॅलेंटाईन डे चा चौथा दिवस ‘टेडी डे’ म्हणून साजरा केला जातो. टेडी हा प्रेम, काळजी आणि आपुलकीचे प्रतिक आहे. मुलींनासुद्धा टेडी खूप आवडतात. त्यामुळे या दिवशी एकमेकांना टेडी देऊन तुम्ही आपलं प्रेम व्यक्त करू शकता.
दिवस 5 – प्रॉमिस डे (11 फेब्रुवारी) Promise Day
व्हॅलेंटाईन डेचा पाचवा दिवस ‘प्रॉमिस डे’ म्हणून साजरा केला जातो. प्रेमात वचन देणं आणि ते निभावणं खूप महत्त्वाचे असते. त्यामुळे प्रॉमिस डे च्या दिवशी कपल्स एकमेकांना खूप प्रेम देण्याचे आणि कायम सोबत राहण्याचे वचन देतात. Valentine Week 2023
दिवस 6 – हग डे (12 फेब्रुवारी) Hug Day
व्हॅलेंटाईन डेच्या 6 व्या दिवशी म्हणजेच 12 फेब्रुवारीला हग डे साजरा केला जातो. ‘हग डे’ म्हणजे एकमेकांना प्रेमाने मिठी मारणे. त्यामुळे या दिवशी कपल्स एकमेकांना मिठी मारून आपले प्रेम व्यक्त करतात.
दिवस 7- किस डे (13 फेब्रुवारी)Kiss Day
व्हॅलेंटाईन डेच्या 7 व्या दिवशी किस डे साजरा केला जातो. या दिवशी प्रेम करणे कपल्स आपल्या जोडीदाराच्या कपाळावर, हातावर किंवा ओठांवर किस घेऊन आपलं प्रेम व्यक्त करतात.
दिवस 8 – व्हॅलेंटाईन डे (14फेब्रुवारी) Valentine Day
आणि सर्वात शेवटी १४ फेब्रुवारी ला व्हॅलेंटाईन डे येतो. या दिवशी प्रेमी युगुल एकमेकांसोबत निवांत क्षण घालवतात आणि एकमेकांच्या सोबतीने हा दिवस घालवतात.