औरंगाबाद : जिल्हा रुग्णालय येथील सिटीस्कॅन मशिन बंद पडल्याने रुग्णांची हेळसांड होत आहे. नोव्हेंबर 2020 मध्ये केबल खराब झाल्याने मशीन बंद झाली होती. मे महिन्यात केबल दुरुस्त झाले. मात्र डेमो घेतल्या नंतर दुसऱ्या दिवशी मशीन बंद पडली. त्यामुळे आता पुन्हा त्याचे पार्ट दुरुस्त करण्यात येत आहेत.
यासाठी पुन्हा निविदा काढण्यात येणार आहेत विशेष म्हणजे मार्च महिन्यात पंधरा दिवसात मशीन दुरुस्त करण्यात येणार असल्याचे आश्वासन आरोग्य उपसंचालक डॉक्टर स्वप्नील लाळे यांनी दिले होते. चार महिने उलटले तरीही मशीन सुरू झाले नाही यासंदर्भात डॉक्टर लांळे यांना विचारले असता मशीन दुरुस्तीसाठी निधी लागणार आहे. त्यासाठी मुंबईत पाठपुरवठा करणार असून निधी मिळवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे ते म्हणाले जिल्हा रुग्णालय जानेवारी 2019 मध्ये सिटीस्कॅन मशिन दाखल झाली होती. मशीन कार्यान्वित होण्यासाठी बराच कालावधी लागला त्यानंतर नोव्हेंबर 2020 मध्ये मशीनचे केबल खराब झाल्याने मशीन बंद पडली तेव्हापासून अजूनही मशीन बंदच आहे.
जिल्हाधिकाऱ्यांच्या बैठकीत लोकप्रतिनिधींचा प्रश्न निष्फळ ठरलेले दिसून येत आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या बैठकीत खासदार डॉक्टर भागवत कराड खासदार इम्तियाज जलील, आमदार अतुल सावे,यांनी कायम या विषयावर आवाज उठवला दरवेळी लवकरच सुरू होणार असून प्रशासकीय उत्तर त्यांना देण्यात आले होते. मात्र मशीन सुरू झाली नाही. त्यामुळे बैठकीतील लोकप्रतिनिधींचे प्रश्नही निष्फळ ठरले आहेत.