Vande Bharat Express : देशात लवकरच सुरु होणार 10 नवीन वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन

Vande Bharat Express new trains
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | भारतातील सर्वोत्कृष्ट एक्सप्रेस असणारी वंदे भारत एक्सप्रेसची (Vande Bharat Express) संख्या दिवसेंदिवस वाढवण्यात येत आहे. प्रवासासाठी अत्यंत आरामदायी असल्याने अनेकजण वंदे भारत एक्सप्रेसला आपलं प्राधान्य देतात. हाच विचार करून सरकार सातत्याने वेगवेगळ्या राज्यात नवनवीन वंदे भारत एक्सप्रेस सुरु करत आहेत. सध्याच्या घडीला भारतात 33 वेगवेगळ्या मार्गांवर वंदे भारत एक्सप्रेस चालवण्यात येत आहेत. यामध्ये आता आणखी 10 वंदे भारत एक्सप्रेसची भर भारतीय रेल्वेच्या माध्यमातून करण्यात येणार आहे. यामध्ये मुख्यत्वे करून महाराष्ट्राला आणखी दोन वंदे भारत एक्सप्रेस मिळणार आहेत.

मुंबई ते जालना यादरम्यान धावणार नवीन वंदे भारत एक्सप्रेस :

भारतीय रेल्वेच्या सर्वात महत्वाच्या समजला जाणारा विभाग दक्षिण मध्य रेल्वे विभागाअंतर्गत सर्वात व्यस्त मार्गांवर नवीन वंदे भारत एक्सप्रेस सुरु होण्याची शक्यता आहे. ही वंदे भारत एक्सप्रेस पुणे ते सिकंद्राबाद दरम्यान असणार आहे. याआधीच या मार्गांवरील पुणे ते सोलापूर दरम्यान वंदे भारत एक्सप्रेस मागील काही महिन्यांपासून धावते आहे. व ह्या एक्सप्रेस ला उत्तम प्रतिसाद मिळताना दिसून येत आहे. पुणे ते सिकंद्राबाद हा रेल्वे मार्ग व्यस्त मार्गांपैकी एक आहे. त्याचबरोबरीने महाराष्ट्रात मुंबई ते जालना यादरम्यान नवीन वंदे भारत एक्सप्रेस (Vande Bharat Express) धावणार आहे.

देशभरात लवकरच सुरू होणार्‍या 10 नवीन वंदे भारत: Vande Bharat Express

देशभरात लवकरच सुरू होणार्‍या 10 नवीन वंदे भारत एक्सप्रेस गाड्यांपैकी एक सिकंदराबाद-पुणे मार्गावर सुरू केली जाणार आहे , जी सर्वात व्यस्त मानली जात आहे . सिकंदराबाद-पुणे याशिवाय, वाराणसी-लखनौ, पाटणा-जलपाईगुडी, मडगाव-मंगळूर, दिल्ली-अमृतसर, इंदूर-सुरत, मुंबई-कोल्हापूर, मुंबई-जालना, पुणे-वडोदरा आणि टाटानगर-वाराणसी विभागांदरम्यान नवीन व्हीबी एक्स्प्रेस गाड्यांचे नियोजन केले जात आहे.