हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | वंदे भारत एक्सप्रेस (Vande Bharat Express) मधून प्रवास करण्याची मागणी प्रचंड वाढली आहे. भारताच्या कानाकोपऱ्यातून वेगेवेगळ्या मार्गावर वंदे भारत एक्सप्रेस धावत आहे. अतिशय आकर्षक लूक, आरामदायी प्रवास आणि लांबच्या पल्ल्यासाठी योग्य असल्याने प्रवाशी वंदे भारत एक्सप्रेसला आपली पंसती दाखवत आहेत. महाराष्ट्राला आत्तापर्यंत २ वंदे भारत एक्सप्रेस मिळाल्यात , आता यामध्ये आणखी २ वंदे भारत एक्सप्रेसची वाढ होणार आहे.
भारतीय रेल्वे आपली प्रवासी सेवा सुधारण्यासाठी वंदे भारत एक्सप्रेस (Vande Bharat Express)भारताच्या वेगवेगळ्या मार्गांवर चालवल्या जात आहेत .वंदे भारत एक्सप्रेस देशातील सर्वात वेगवान ट्रेन आहे, ज्याचा सर्वाधिक वेग ताशी 180 किमी आहे, तर कार्यरत वेग 130 किमी प्रतितास आहे. नव्या युगातील या ट्रेनमधील प्रवासामुळे प्रवासाचा कालावधी २५ टक्क्यांनी कमी होऊन ४५ टक्के झाला आहे.भारतीय रेल्वेद्वारे चालू आर्थिक वर्षाच्या शेवटपर्यंत म्हणजेच मार्च 2024 पर्यंत भारतात 75 वंदे भारत एक्सप्रेस चालवण्याचे नियोजन करण्यात आले आहे. याच नियोजनानुसार महाराष्ट्रातील आणखी दोन मार्गांवर वंदे भारत एक्सप्रेस चालवण्याचे नियोजन रेल्वे करत आहे.
दोन महत्वाच्या मार्गांवर Vande Bharat Express चालवण्याचे नियोजन :
महाराष्ट्रातील मध्य रेल्वेच्या विभागाच्या माध्यमातून आणखी दोन मार्गांवर वंदे भारत एक्सप्रेस चालवण्यासाठीचा प्रस्ताव रेल्वे बोर्डाला पाठवल्याची माहिती मिळत आहे. याच प्रस्तावानुसार ” मुंबई ते छत्रपती संभाजीनगर ” व ” पुणे ते सिकंद्राबाद ” अश्या दोन महत्वाच्या मार्गांवर वंदे भारत एक्सप्रेस चालवण्याचे नियोजन मध्य रेल्वे विभाग करत आहे. याबाबतचा अंतिम निर्णय रेल्वे बोर्ड घेणार आहे. त्यानंतरच या दोन्ही मार्गांवर वंदे भारत एक्सप्रेस धावेल .
आयसीफ (IFC) फॅक्टरी मध्ये वंदे भारत एक्सप्रेसचे काम जलद गतीने सुरु :
आजपर्यंत देशभरातील अनेक राज्यात व केंद्रशासित प्रदेशात 40 पेक्षा अधिक वंदे भारत एक्सप्रेस सुरु करण्यात आल्या आहेत. चेन्नई येथील आयसीफ ( ICF ) फॅक्टरी मध्ये वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन बनवण्याचे काम अधिक गतीने सुरु आहे. त्यानुसार वर्षाअखेर 75 वंदे भारत एक्सप्रेस चालवल्या जाणार आहेत. महाराष्ट्रात आत्तापर्यंत मुंबई -शिर्डी, मुंबई -गोवा, मुंबई – सोलापूर या रेल्वे मार्गांवर वंदे भारत एक्सप्रेस चालवण्यात येत आहेत. भविष्यात यामध्ये मुंबई ते छत्रपती संभाजीनगर ” व ” पुणे ते सिकंद्राबाद ” अश्या दोन महत्वाच्या मार्गाची भर पडणार आहे.