Vande Bharat Express : दिवाळीच्या मुहूर्तावर सुरु होणार 9 वंदे भारत एक्सप्रेस; काय असेल रुट?

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | सध्या दिवाळी ह्या सणाचे वेध लागले असून, दिवाळीच्या मुहूर्तावर प्रवाश्यांची वाढती गर्दी लक्षात घेत व भारतीय रेल्वेच्या प्रवाश्यांना अधिक चांगल्या सुविधा पुरवण्यासाठी भारतीय रेल्वे आणखी 9 वंदे भारत एक्सप्रेस (Vande Bharat Express) सुरु करणार असल्याचे सांगितले जात आहे. दिवाळीला शाळा व महाविद्यालय यांना असलेल्या सुट्टया व दिवाळीचा  सण मोठ्या प्रमाणात भारत वर्षात साजरा केला जातो त्यामुळे भारतीय  रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाश्यांची संख्या मोठी असते. त्यामुळे ह्या ट्रेन दिवाळीचा मुहूर्त साधून सुरु करण्यात येणार आहेत.

मध्य रेल्वेसाठी ३ वंदे भारत एक्सप्रेस सुरु होणार : Vande Bharat Express

काही मीडिया रिपोर्टनुसार दिवाळीच्या मुहूर्तावर सुरु करण्यात येणाऱ्या 9 वंदे भारत एक्सप्रेस पैक्की 3 वंदे  भारत एक्सप्रेस मध्य रेल्वे विभागात चालवण्यात येणार असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. ज्यामध्ये प्रामुख्याने 3 नवीन  मार्गाची चर्चा  होत आहे. त्यामध्ये  ” मुंबई  ते कोल्हापूर “,  “जालना ते मुंबई ” आणि ” पुणे ते सिकंद्राबाद ” या मार्गांवर वंदे भारत एक्सप्रेस चालवण्यात येऊ शकते .

नवरात्रीच्या आधी वाराणसी ते टाटानगर वंदे भारत  :

भारतीय रेल्वे नवरात्रीच्या आधी आपली 35 वी वंदे भारत वंदे एक्सप्रेस (Vande Bharat Express) वाराणसी ते झारखंड मधील टाटानगर यादरम्यान सुरु करणार आहे. ज्यामुळे वाराणसी या शहराला जोडणारी ही दुसरी वंदे भारत एक्सप्रेस ठरेल .उर्वरित वंदे भारत दिवाळीच्या मुहूर्तावर सुरु करण्यात येणार आहेत. आजपर्यंत भारतीय रेल्वे एकूण 34 वंदे भारत एक्सप्रेस संपूर्ण भारतात चालवत  आहे. त्यांना प्रवाश्यांकडून उत्तम प्रतिसाद देखील मिळताना दिसून येत आहे.