Vande Bharat Express : आज देशाला मिळणार 9 वंदे भारत एक्सप्रेस; पहा काय असेल रूट

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | वंदे भारत एक्सप्रेस (Vande Bharat Express) दबदबा भारतीय रेल्वेमध्ये वाढतच चालला आहे. प्रवाश्यामध्ये वंदे भारत एक्सप्रेस मधून प्रवास करण्यासाठी मागणी वाढत आहे आणि भारतीय रेल्वे सुद्धा आपली प्रवासी सेवा सुधारण्यासाठी वंदे भारत एक्सप्रेसचा विस्तार देशाच्या कानाकोपऱ्यात करत आहे. आत्तापर्यंत भारतीय रेल्वे 23 पेक्षा जास्त मार्गांवर वंदे भारत एक्सप्रेस चालवत आहे. त्यातच आज आणखी ९ वंदे भारत ट्रेन आजपासून धावणार आहेत.

मोदी दाखवणार हिरवा झेंडा – 

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आज 24 सप्टेंबर रोजी दुपारी 12:30 वाजता व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे 9 वंदे भारत ट्रेनला (Vande Bharat Express) हिरवा झेंडा दाखवणार आहेत. या 9 ट्रेन कर्नाटक, ओडिशा, तामिळनाडू, झारखंड, गुजरात , तेलंगणा, राजस्थान,आंध्र प्रदेश, बिहार, पश्चिम बंगाल आणि केरळ अशा 11 राज्यांमध्ये धावणार आहेत. यातील पश्चिम बंगालमधील हावडा आणि तामिळनाडूमधील चेन्नईला प्रत्येकी 2 ट्रेन मिळणार आहेत.

काय असेल रूट – Vande Bharat Express

१) उदयपूर- जयपूर वंदे भारत एक्सप्रेस
२) तिरुनेलवेली-मदुराई-चेन्नई वंदे भारत एक्सप्रेस
3) हैदराबाद-बेंगळुरू वंदे भारत एक्सप्रेस
4) विजयवाडा-चेन्नई (रेनिगुंटा मार्गे) वंदे भारत एक्सप्रेस
5) पाटणा-हावडा वंदे भारत एक्सप्रेस
6) कासरगोड-तिरुवनंतपुरम वंदे भारत एक्सप्रेस
७) राउरकेला-भुवनेश्वर-पुरी वंदे भारत एक्सप्रेस
8) रांची-हावडा वंदे भारत एक्सप्रेस
९) जामनगर-अहमदाबाद वंदे भारत एक्सप्रेस

पंतप्रधान नरेंद्र मोदी या ९ वंदे भारत एक्सप्रेसला (Vande Bharat Express) हिरवा झेंडा दाखवल्यानंतर भारतात एकूण 32 वंदे भारत एक्सप्रेस रेल्वे रुळावरून धावतील. भविष्यात ही संख्या आणखी वाढवली जाईल जेणेकरून भारतीय रेल्वेच्या प्रवाश्यांना अधिक चांगल्या सुविधा वंदे भारत एक्सप्रेसच्या माध्यमातून देण्यात येतील. वंदे भारत एक्सप्रेसमुळे प्रवाशांचा वेळ वाचण्यास मोठी मदत होत आहे. तसेच रेल्वे प्रवासही अधिक सुखकर आणि आरामदायी होणार आहे.